For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगावात ३१ रोजी सकल हिंदू संमेलन

03:19 PM May 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मळगावात ३१ रोजी सकल हिंदू संमेलन
Advertisement

न्हावेली /वार्ताहर
हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती, मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मळगाव शालू मंगल कार्यालय येथे रविवारी दिनांक ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते म्हणून डॉ. प्रवीणकुमार गणेशराव ठाकरे, अध्यक्ष सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सावंतवाडी तालुका ह. भ. प. श्री लक्ष्मण दत्ताराम कडव महाराज यांची असणार आहे. तर संयोजक म्हणून ह. भ. प. श्री. शेखर मधुकर पाडगावकर निवृत्त राजपत्रित अधिकारी हे असणार आहेत.सर्व माता, बंधू आणि भगिनींनी सहकुटुंब आपल्या मित्र परिवारासहित पारंपारिक मंगल वेषात या संमेलनात उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव पंचक्रोशी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.