For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी घेतली आ. निलेश राणेंची भेट

03:22 PM Mar 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी घेतली आ  निलेश राणेंची भेट
Advertisement

भारतविरोधी घोषणा देणाऱ्या मुस्लीम परप्रांतीय विरोधात घेतलेल्या भूमिकेचे केले स्वागत

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

भारत विरोधी घोषणा देणाऱ्या आडवण येथील परप्रांतीय मुस्लीम कुटुंबाविरोधात सकल हिंदू समाजाने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत कठोर कारवाईस प्रशासनास भाग पाडल्या बद्दल मालवण येथील सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी आपण नेहमीच सोबत असल्याचा विश्वास सकल हिंदू समाजाला दिला.या संपुर्ण प्रकरणात त्या भारत विरोधी मुस्लीम परप्रांतीय भंगार व्यवसायिकाची तक्रार देणाऱ्या सचिन वराडकर यां तरुणाचा सत्कार आमदार निलेश राणे यांनी केला. यावेळी भाऊ सामंत, सचिन वराडकर, अवी सामंत, अनिकेत फाटक, हरेश पडते, विजय केनवडेकर, भाई मांजरेकर, ललित चव्हाण, प्रसाद हळदणकर, तेजस चव्हाण, गणेश चव्हण, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, संदीप बोडवे यांसह अन्य उपस्थित होते.

Advertisement

फोटो : मालवण येथील सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. (अमित खोत, मालवण)

Advertisement
Tags :

.