For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौड सारस्वत ब्राह्मण समाज भवनासाठी सर्वतोपरी प्रयत्न

03:19 PM Apr 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
गौड सारस्वत ब्राह्मण समाज भवनासाठी सर्वतोपरी प्रयत्न
Advertisement

जि.प .अध्यक्ष प्रमोद कामत यांचे प्रतिपादन ; समाजबांधवांकडून सावंतवाडीत सत्कार

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे भव्य असे गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे भवन उभारण्यात येणार आहे. या भावनासाठी माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य केली जाईल. सारस्वत ब्राह्मण समाजाने आजपर्यंत मला समाजकारण, राजकारणात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे या समाजाचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे केले. सावंतवाडी येथील मांगीरीश बँक्वेट हॉल येथे गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने प्रमोद कामत यांचा जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष वासुदेव झांटये , सारस्वत बँक संचालक सुनील सौदागर, उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री, उद्योजक शैलेश पै, प्रज्ञा कामत, वैभव केंकरे, काशिनाथ दुभाषी, रमेश पई, ॲड .सायली दुभाषी, गुरुदत्त कामत, प्रसाद महाले, संतोष कुलकर्णी, विशाल पै, सिद्धेश कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, जतीन कुलकर्णी, डॉ. क्षमा देशपांडे, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, श्याम पंडित, सचिन मांजरेकर, अवधूत कळसुलकर, मनोज कुलकर्णी, अमोल प्रभू झांटये, संजय पूनाळेकर, प्रशांत कामत, भूषण कुलकर्णी, नरेंद्र देशपांडे, कुंदा पै, नितेश पिंगे, राहुल शेणई, सोनू रांगणेकर, आशुतोष भांगले आदी उपस्थित होते. यावेळी श्री प्रमोद कामत यांचा शाल, श्रीफळ, व भेटवस्तू देऊन भाई मंत्री आणि सुनील सौदागर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील सुवासिनींनी प्रमोद कामत यांच्या पत्नी प्रज्ञा कामत यांचाही ओटी भरून सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही प्रमोद कामत यांना सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित प्रभू झांटये यांनी तर आभार प्रसाद महाले यांनी मानले

Advertisement

Advertisement
Tags :

.