कट्टा पंचक्रोशी भंडारी समाजाच्यावतीने उद्या सर्वजातीय वधू-वर मेळावा
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ, कट्टा ता. मालवण यांंच्यावतीने सर्वजातीय (OPEN, OBC, SBC, SC, ST, NT, VJ) प्रथम वर, प्रथम वधू, घटस्फोटीत, विधवा, विधुर, आंतरजातीय विवाह इच्छुक, पुनर्विवाह इच्छुक वधु - वर परिचय मेळावा शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं ५.०० या वेळेत ओम गणेश साई मंगल हॉल - कट्टा, ता. मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे विशेष म्हणजे मेळावा सहभागीमध्ये भावी वधुंसाठी मोफत असून या मेळाव्यात सहभागी होणार्या भावी वरांसाठी प्रवेश फी फक्त ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. मेळाव्यात उपस्थित राहणार्या भावी वधूवरांसाठी चहापान, नाश्ता तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व समाजातील भावी वधूवरांसाठी हा मेळावा म्हणजे एक सुसंधी असून दोन कुटुंबांची मने जोडून एका नव्या नात्याची रेशीमगाठ जुळवण्यासाठी आणि वधूवरांच्या मनी सजलेली स्वप्ने लग्न बंधनात बांधण्यासाठी कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाने या अभिनव मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व जातीतील वधू- वरांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्रदीप आवळेगावकर ९८६९४१११५९, जीजी वाईरकर ९४२०२०७०६१, प्रवेश फी साठी गुगल पे क्रमांक सुरेश कांबळी ९७६६४१९८१९ यांच्याशी संपर्क करावा.