For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

६० लाख डॉलरचा दंड अन् अमेरिकेतील विरोधातील सर्व खटले बंद; गौतम अदानींना मोठा दिलासा

03:27 PM May 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
६० लाख डॉलरचा दंड अन् अमेरिकेतील विरोधातील सर्व खटले बंद  गौतम अदानींना मोठा दिलासा
Advertisement

गेल्या काही काळापासून भारतासह जगभरातल्या उद्योगविश्वात चर्चेचा विषय ठरलेले अमेरिकन न्यायालयातील अदानी खटला प्रकरण अखेर बंद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता अदानी उद्योगसमुहाचे सर्वोसर्वा गौतम अदानी यांच्यावरील सर्व खटले आता रद्द करण्यात आले आहेत.

Advertisement

अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्याविरोधातील सर्व फौजदारी खटले कायमचे मागे घेतले आहेत. न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टाने हा खटला "विथ प्रेज्युडिस" म्हणजेच कायमस्वरूपी बंद केला. या निर्णयाने हे प्रकरण कायमचे संपले असुन पुन्हा हा खटला चालवला जाऊ शकत नाही.

प्रकरण नेमके काय होते?

Advertisement

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका फेडरल कोर्टाने गौतम अदानी आणि इतरांवर सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉडचे गंभीर आरोप ठेवले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या या खटल्यात भारतातील सौर ऊर्जा करारांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा हा आरोप होता.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकी SEC च्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात तब्बल २६५ दशलक्ष डॉलर इतकी लाच दिल्याचा आरोप अदानी समुहावर करण्यात आला होता.

अदानी यांनी दंड भरला

या संपूर्ण प्रकरण दोन टप्प्यात बंद करण्यात आले आहे. . SEC सोबतच्या तडजोडीत गौतम अदानी यांनी ६० लाख डॉलर आणि सागर अदानी यांनी १.२ कोटी डॉलर दंड भरण्यास मान्यता दिली आहे. मात्र दोघांनीही कोणताही आरोप मान्य केलेला नाही. त्याचबरोबर DOJ ने फौजदारी खटला पूर्णपणे मागे घेतला. OFAC म्हणजे अमेरिकी ट्रेझरी विभागाशी संबंधित निर्बंध प्रकरणाचाही सुमारे २७.५ कोटी डॉलर इतका दंड दिल्यानंतर हे खटले मागे घेतल्याची माहिती आहे.

निकाल काय सांगतो?

हा निकाल केवळ अदानींची या खटल्यातून सुटका एवढाच मांडता येणार नाही. कारण अदानी जागतिक पातळीवरचे उद्योगपती आहेत.  हा निकाल अडानी समूहाच्या जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून एक टर्निंग पॉइंट आहे. नोव्हेंबर २०२४ पासून या खटल्याच्या सावटाखाली अदानी समूहाच्या अनेक आंतरराष्ट्रीय योजना रखडल्या होत्या, विदेशी गुंतवणूकदार याबाबतीत साशंक होते, त्यांचा मार्ग आता नव्या गुंतवणुकीसाठी मोकळा होणार आहे असे विश्लेषकांचे मत आहे.

अदानी समूहाने गेल्या काही महिन्यांतच मोठ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिंगापूरची Temasek आणि Alpha Wave Global मिळून अदानी एअरपोर्ट होल्डिंग्समध्ये तब्बल १.३ अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या चर्चेत आहेत. या डीलचे मूल्यांकन सुमारे १८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते, तर अदानी समूह स्वतः २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त मागत असल्याचे सांगितले जाते.

जून २०२५ मध्येच अदानी समूहाने मुंबई विमानतळ व्यवसायाच्या कर्जाच्या पुनर्गठनासाठी Apollo Global Management, MetLife, BlackRock आणि FWD Insurance यांसारख्या मातब्बर जागतिक संस्थांकडून १ अब्ज डॉलर उभे केले होते. हे सारे परत येणे म्हणजेच अदानी समूहावर आंतरराष्ट्रीय विश्वासाची पुनर्स्थापना होणे होय.

विमानतळांचा आराखडा

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचे आर्थिक निकाल देखील उत्साहवर्धक आहेत. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये महसूल ३४.४% वाढला, तर नफा दुप्पट होऊन १,७३१ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२७ साठी सुमारे ४०,००० कोटींचा भांडवली खर्च आराखडा तयार करण्यात आला असून, यात विमानतळांसाठीच १७,००० कोटी रुपये ठेवले आहेत.

गौतम अदानी यांनी AGM मध्ये जाहीर केले की समूह पुढील पाच वर्षांत दरवर्षी १५ ते २० अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे. बंदरे, विमानतळे, ऊर्जा, सिमेंट, डेटा सेंटर, संरक्षण उत्पादन अशा अनेक क्षेत्रांत ही गुंतवणूक असेल.

Advertisement
Tags :

.