कणकवली मतदारसंघातील छाननीमध्ये सर्व अर्ज वैध
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारांनी दाखल केलेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता या विधानसभा मतदारसंघात आता आठ उमेदवार रिंगणात असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर रोजी दु. ३ वा. पर्यंत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, गणेश माने, प्रकाश नारकर आदी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सकाळी ११ वा. ही छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. छाननीत सर्व अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. त्यामुळे आता या मतदारसंघात मतदारसंघात निवडणूक २०२४ साठी भाजपा महायुतीचे नितेश नारायण राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे संदेश भास्कर पारकर, अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीच चंद्रकांत जाधव, अपक्ष गणेश माने यांचे अर्ज वैध ठरले. या छाननीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार लक्ष्मण कुसेकर, वैभववाडी सूर्यकांत पाटील उपस्थित होते.