For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक“ खटल्यांतील सर्वांची निर्दोष मुक्तता

01:27 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक“ खटल्यांतील सर्वांची निर्दोष मुक्तता
Advertisement

कर्नाटकी पोलिसांना सणसणीत चपराक : 7 पैकी उर्वरित 2 खटल्यांचा निकाल : 56 जणांना दिलासा

Advertisement

बेळगाव : सत्याला त्रास आहे, पण जय निश्चित आहे! हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्याच्या निकालाच्या माध्यमातून आधोरेखित झाले आहे. न्यायालयातील 7 पैकी 5 खटल्यांमधील यापूर्वीच सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर उर्वरित 2 खटल्यांतील 56 जणांचीदेखील न्यायालयाने बुधवार दि. 8 एप्रिल रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. 12 वर्षांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्यात निष्पापांना गोवले होते. पण सरकारलाच गुन्हा सिद्ध करता आला नाही. या खटल्यांचे निकाल पोलिसांना सणसणीत चपराक बसणारे ठरले आहेत.

खटला क्रमांक 122/15 मध्ये अर्जुन नागाप्पा गोरल, रमेश मारुती घाडी, नंदू गोपाल कुगजी, मारुती दत्तू देसाई, पिंटू रमेश धामणेकर, बसवंत रामा लोहार, श्रीकांत शिवाजी नंदुडकर, सागर यल्लाप्पा काकतकर, अमित शिवाजी जाधव, मनोहर भैरु कुंडेकर, विठ्ठल बाबू कुरंगी, शंकर भुजंग कणबरकर, परशराम दानाप्पा कंग्राळकर, अनंत परशराम कंग्राळकर, शिवाजी महादेव जाधव, प्रशांत मनोहर कुगजी, अर्जुन रामाप्पा चौगुले, प्रशांत शंकर टक्केकर, परशराम देवाप्पा धामणेकर, अनंत चांगाप्पा पुंडेकर, मधू गोविंद कुगजी, कृष्णा परशराम काकतकर, अशोक जयराम धामणेकर, तानाजी भरमा हलगेकर, मारुती लक्ष्मण गोरल, चांगाप्पा कृष्णा हलगेकर, अरविंद आण्णाप्पा पाटील, नारायण महादेव काकतकर, शामल नारायण जाधव, सुधा आनंद जाधव, मालन मल्लाप्पा जाधव, कमला यल्लाप्पा पोटे, जयश्री नारायण खादरवाडकर, रामचंद्र ईश्वर बागेवाडी, विकास गणपत पाटील, सुनील गणपत पाटील, सतीश मनोहर कुगजी अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

Advertisement

खटला क्रमांक 126/15 मध्ये अर्जुन नागप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाणी चिठ्ठी, वृषसेन चंद्रकांत पाटील, संभाजी बाबुराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगाप्पा धामणेकर, श्रीकांत शिवाजी नंदुडकर, राहुल मारुती कुगजी, नागेश सुभाष बोबाटे, सुनील रामा पुंडेकर, रवळू महादेव कुगजी, केशव कृष्णा हलगेकर, गणपती इराप्पा पाटील, नामदेव विठ्ठल नायकोजी, केशव महादेव पाटील, रमेश जयराम धामणेकर, रामचंद्र नारायण कुगजी, सतीश मनोहर कुगजी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खटला क्रमांक 122 मध्ये एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये सात जणांना वगळण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर खटला क्रमांक 126 मध्ये एकूण 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 5 जणांना वगळण्यात आले. येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटविण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांवर अमानुष लाठीमार केला होता. उलट ग्रामस्थांवर सात वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. मात्र सरकार पक्षाला गुन्हे सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यांचे कामकाज ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचण्णावर, ॲड. शाम पाटील यांनी पाहिले.

तिन्ही वकिलांचे कार्य कौतुकास्पद...

2014 पासून सातही खटल्यांचे न्यायालयीन कामकाज ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचण्णावर, ॲड. शाम पाटील यांनी पाहिले. तब्बल 12 वर्षांपासून खटल्यांचा पाठपुरावा केला. विशेष म्हणजे सर्वांची निर्दोष मुक्तता करून कर्नाटक पोलिसांना अद्दल घडविली आहे. या सर्व खटल्यांमधील एकाही ग्रामस्थांकडून एकही रुपया न घेता स्वखर्चाने खटल्यांचे कामकाज पाहिल्याने तिन्ही वकिलांचे येळ्ळूर ग्रामस्थ व सीमावासियांतून कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.