कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'महांकाली' निवडणूक सर्व 104 अर्ज अवैध

01:37 PM Feb 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कवठेमहांकाळ : 

Advertisement

महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 17 जागांसाठी उमेदवारांच्या अर्जाची शुक्रवारी छाननी झाली. छाननीमध्ये सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अस्वीकृत केले.

Advertisement

यासाठी 7  रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता.  104 अर्ज दाखल केले होते. याची छाननी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी काकडे यांच्यासमोर झाली. पोटनियमातील तरतुदीनुसार अर्जदारांनी सलग तीन वर्षे ऊस गाळपासाठी घालणे बंधनकारक असल्याने, काही अर्जदारांनी आक्षेप घेतला. कारखाना बंद असल्याने सर्वच उमेदवारांनी ऊस न घातल्याने पोटनियम तरतुदीनुसार त्यांनी  सर्व अर्ज अस्वीकृत केले. याबाबत कार्यकारी संचालक यांनी पोटनियमतील तरतुदी शिथिल करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा असा निकाल दिला. शुक्रवारी छाननी असल्याने सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थिती दाखवली होती.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article