For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलिजेह अग्निहोत्रीचे उजळले भाग्य

06:06 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
अलिजेह अग्निहोत्रीचे उजळले भाग्य
Advertisement

बॉलिवूडमधील स्टार किड्समध्ये सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीचाही समावेश होतो. सुमारे 3 वर्षांपूर्वी प्रदर्शित ‘फर्रे“ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता अलिजेहचे नशीब उजळले असून तिला एक चित्रपट मिळाला आहे.

Advertisement

अलिजेहचा आगामी चित्रपट हॉरर-कॉमेडी जॉम्बी थ्रिलर धाटणीचा असणार आहे. अलिजेह ही सलमान खानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. स्वत:चा मामा आणि पित्यामुळे ती बॉलिवूडमध्ये नाम कमावू पाहत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हैज-कॉलेज फेस्ट“ असणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी आणि जॉम्बी थ्रिलरपट असेल. यात अलिजेहसोबत युट्यूबर आशीष चंचलानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. चित्रपट कॉलेज फेस्टची निर्मिती टीव्हीएफकडून केली जाणार आहे. तर याची दिग्दर्शनाची धुरा वैभव बंधू सांभाळणार आहे. कॉलेज फेस्ट हा जेन-जीची कॉलेज स्टोरी दाखविणारा चित्रपट असेल. यात एका कॉलेज फेस्टदरम्यान रहस्यमय संक्रमण फैलावते आणि यामुळे कॉलेजचे विद्यार्थी जॉम्बीमध्ये बदलतात असे दाखविण्यात आले आहे. अलिजेहची भूमिका चित्रपटात अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. कॉलेज फेस्ट चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.