म्युझिकल प्रोजेक्टमध्ये अलिजेह अग्निहोत्री
सिद्धांत चतुर्वेदीसोबत करणार काम
2014 साली प्रदर्शित झालेला फ्रेंच चित्रपट ‘ला फॅमिली बेलियर’चा हिंदी रिमेक केला जाणार आहे. निर्मात्यांनी या म्युझिकल चित्रपटासाठी सिद्धांत चतुर्वेदी आणि अलिजेह अग्निहोत्री यांची निवड केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून याचे चित्रिकरण जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
ला फॅमिली बेलियर एक विनोदी धाटणीचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन एरिक लार्टिगाउ यांनी केले होते. याची कहाणी एका 16 वर्षीय मुलीच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. युवती स्वत:च्या मूकबधिर आईवडिलांची देखभाल करते. परंतु ासंगीत शिक्षकाला तिच्या सुंदर आवाजाबद्दल कळल्यावर तिचे आयुष्य बदलून जाते. मुलीला स्वत:ची स्वप्ने पूर्ण करणे आणि स्वत:च्या परिवाराबद्दलच्या जबाबदारीपैकी एकाच निवड करावी लागते. ला फॅमिली बेलियर चित्रपटाने 2022 मध्ये ऑस्कर पुरस्कार पटकाविला होता.
सिद्धांत यापूर्वी ‘धडक 2’ चित्रपटात दिसून आला होता. तसेच तो लवकरच मृणाल ठाकूरसोबत ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटात दिसून येणार आहे. तर अलिजेहने 2023 मध्ये प्रदर्शित चित्रपट ’फर्रे’द्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु हा चित्रपट फारसा चालला नव्हता. यामुळे अलिजेहच्या कारकीर्दीसाठी आता एका हिट चित्रपटाची आवश्यकता आहे.