महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अलिम दारकडून निवृत्तीचे संकेत

06:33 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

Advertisement

आयसीसीच्या पंचपॅनेलमधील अनुभवी आणि ज्येष्ठ क्रिकेट पंच पाकचे अलिम दार हे 2025 साली पंचगिरी क्षेत्रातून निवृत्त होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Advertisement

56 वर्षीय अलिम दार यांचा आयसीसीच्या इलाईट पॅनेलमध्ये 2003 पासून ते 2023 पर्यंत समावेश आहे. पाकच्या इलाईट पंचपॅनेलमध्येही अलिम दार यांचा समावेश आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये आतापर्यंत पाकच्या चार पंचांचा समावेश आहे. अलिम दार यांनी आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये वनडे आणि टी-20 मध्ये महत्वाच्या सामन्यांत पंचगिरी केली आहे. अलिम दार यांनी 1986 ते 98 या कालावधीत 17 प्रथमश्रेणी सामन्यात तसेच 18 लिस्टए सामन्यात खेळ केला आहे. पाकच्या प्रिमीयर लीग स्पर्धेमध्ये अलिम दार यांनी आपल्या प्रथमश्रेणी पंचगिरीला प्रारंभ केला तसेच 1999 साली त्यांचा कैद ए अझम चषक देवून सत्कार करण्यात आला होता. अलिम दार यांनी आपल्या 25 वर्षांच्या कालावधीत 145 कसोटी, 231 वनडे, 72 टी-20 तसेच आयसीसीच्या 5 टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पंचगिरी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article