अमेरिकेतील बापलेकीने डिकोड केला एलियन सिग्नल
मंगळ ग्रहावरून आला होता संदेश
वर्षभराच्या मेहनतीनंतर अमेरिकेतील पिता-कन्येच्या टीमेने एलियन सिग्नल डिकोड केला आहे, हा सिग्नल मंगळ ग्रहावरुन पाठविण्यात आला होता. केन शैफिन आणि केली शैफिन अशी या पिता-कन्येची नावे आहेत. या सिग्नलला मागील वर्षी मे महिन्यात युरोपीय अंतराळ संस्थेच्या एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने मंगळावरून रिसिव्ह करत पृथ्वीवर पाठविला होता.
या सिग्नलला डिकोड करण्यासाठी सेटी इन्स्टीट्यूट, ग्रीन बँक ऑब्जर्वेटरी, ईएसए आणि आयएनएएफने मिळून एक सिटिजन सायंटिस्ट कॉम्पिटिशन आयोजित केली होती. पृथ्वीवर असलेल्या तीन रेडिओ एस्ट्रोनॉमी ऑब्जर्वेटरीने या सिग्नल कॅच केला होता. मग त्याला डिकोड केले, 10 दिवसांनंतर जगभरातून 5 हजारांहून अधिक सिटिजन सायंटिस्ट या सिग्नलला आणखी डिकोड करण्यासाठी प्रयत्नशील झाले. हे सर्व ऑनलाइन स्वरुपात हे काम करत होते.
अमेरिकेतील केन आणि केली शैफिनने या सिग्नलला डिकोड केले, ज्यात पांढऱ्या रंगाचे डॉट्स आणि लाइन्सचे 5 समूह होते. ज्याची पार्श्वभूमी काळ्या रंगाची होती. हा कोशिकाच्या तयार होण्याच्या दिशेने संकेत देत होता. आमच्या डिकोडेड मॅसेजमध्ये 5 अमीनो अॅसिड्स आहेत, जेब्रह्मांडात जीवन निर्माण करतात. हे सर्व जैविक मॉलिक्यूलर डायग्राम आहेत. म्हणजेच आयुष्य देणाऱ्या अमीनो अॅसिड्सचे डायग्राम असे केन आणि केली यांनी सांगितले आहे. या ब्लॉक्समध्ये 1, 6, 7, 8 पिक्सेलचे एटॉमिक नंबर मिळतील. म्हणजेच हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, सिंगल आणि डबल बाँड्सद्वारे डायग्राममध्ये लाइन्स निर्माण झाल्या आहेत. हा प्रकार साधारण अॅटोमिक डायग्राममध्ये असतो, डॉट्स त्यांना जोडण्याचे काम करते असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे काय?
केनी आणि केली यांनी सिग्नल डिकोड केला असून अद्याप सिटिजन सायंटिस्ट याबद्दल जाणून घेत आहेत. स्पर्धा अद्याप सुरू आहे. आता पुढील उद्देश या डिकोडेड संदेशाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा आहे. आता शैफिन परिवार स्वतंत्रपणे काही परीक्षणं करणार आहे, जेणेकरून याच्या मागे लपलेला संदेश समजून घेता येईल.