लांब कवटी, 3 बोटांची ‘एलियन ममी’
1200 वर्षांपूर्वी होते जिवंत
पेरूच्या नाज्का वाळवंटात 2017 मध्ये काही अजब ममी मिळाल्या होत्या. या ममीच्या अवशेषांमध्ये तीन बोटं आणि लांब कवटी होती. त्यावेळी वैज्ञानिकांनी याला एलियनची ममी मानले हेते. परंतु आता तपासणीनंतर या ममी खऱ्याखुऱ्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्राणी कधीकाळी जिवंत राहिला असेल आणि याची हत्या करण्यात आली होती असे सांगण्यात आले.
3 बोटे असलेल्या एलियन ममीज 2017 मध्ये नाज्का वाळवंटात मिळाल्यापासून वैज्ञानिक संशोधन करत होते. या ममी 1200 वर्षे जुन्या असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पेरूच्या एलियन ममीजची हत्या करण्यात आली असावी असेही त्यांचे मानणे आहे. लांब कवटीयुक्त रहस्यमय तीन बोटांच्या मृतदेहांची तपासणी करणाऱ्या वैज्ञानिकांनी नवे निष्कर्ष काढले आहेत.
1200 वर्षांपूर्वी हत्येचा दावा
मृतदेहांवरील व्रण पाहता त्यांची हिंसक पद्धतीने हत्या करण्यात आली होती असे कळले आहे. या ममीज दोन वर्षांपूर्वी जगासमोर मांडण्यात आल्या होत्या. प्रारंभिक डीएनए विश्लेषणातून हा प्राणी आंशिक स्वरुपात माणूस आणि आंशिक स्वरुपात ‘अज्ञात प्रजाती’शी संबंधित होता. यापूर्वी ही ममी खरी नसल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला होता. परंतु आता ज्या वैज्ञानिकांनी तपासणी केली आहे, त्यांचे ही ममी खरी असल्याचे मानणे आहे. ज्या तीन ममींचे विस्तृत अध्ययन करय्ण्यात आले, त्यातील मारिया आणि मोंटसेराट नावाच्या दोन मादी ममी तसेच एंटोनियो नामक नर ममी यांची बहुधा हत्या करण्यात आली असावी.
मेक्सिकन नौदल चिकित्सा विभागाचे माजी संचालक डॉ. जोस जाल्स हे या तपासणीचे प्रमुख तज्ञ आहेत. 21 मृतदेहांचे विश्लेषण करण्यात आले, ज्यात बोटांवरील खुणा, हाडांची झीज, दातांची संरचना, स्नायूंची शारीरिक रचना आणि अंतर्गत अवयवांचा शोध लावण्यात आला आहे. मारियाची लांबी 5 फूट 6 इंच होती तिचे मृत्यूवेळी वय 35-45 वर्षांदरम्यान होते, तिच्या शरीराच्या सखल भागात खोल घाव आणि कापल्याच्या खुणा होत्या, तसेच कंबरेच्या हाडावर अनेक घाव होते. शरीरावरील त्वचा हटलेली होती आणि शेपटाचे हाडं तुटले होते. यातून ती एखाद्या टेकडीवरून पडली असल्याची शक्यता असल्याचे जाल्स यांनी सांगितले.
शरीरावर 3 बोटं
मोंटसेराटचा मृत्यू वयाच्या 16-25 वर्षांदरम्यान झाला होता, त्याचा मृत्यू छातीवरील घावामुळे झाल्याचे सीटी स्कॅनद्वारे कळले. तर दोन्ही मादी ममींच्या शरीरावर लांब कवटपी, तीन-तीन बोटं आणि हृदय, यकृत तसेच अतंर्गत अवय आढळून आले आहेत.
एलियन ममींचे शव 100 टक्के खरे
हे मृतदेह 100 टक्के खरे आणि जैविक आहेत, हे कधीकाळी जिवंत राहिले असावेत असे डॉ. जाल्से यांनी म्हटले आहे. पेरूयच मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. डेव्हिड रुइज वेला यांनी एंटोनियोची तपासणी केली होती. तिच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला होता, तिच्या शरीरात छिद्र झाले होते असे त्यांनी सांगितले आहे.