आलिया करणार भयपटात काम
बॉलिवूडला ‘स्री r 2’ यासारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिनेश विजान लवकरच आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. विजान हे एक नवा सुपरनॅचरल हॉररपट निर्माण करणार असून याचे नाव ‘चामुंडा’ आहे. दिनेशच्या या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहे.
आलिया भट्ट सध्या दिनेश विजानसोबत या चित्रपटासाठी बोलणी करत आहे. आलिया अलिकडच्या काळात मॅडॉक फिल्म्सच्या कार्यालयात अनेकदा दिसून आली आहे. आलियाला या चित्रपटाची कहाणी पसंत पडली असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. दिनेश विजानच्या ‘स्त्राr2’ या चित्रपटाने अलिकडेच विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि तमन्ना भाटिया यासारखे कलाकार दिसून आले होते. तर आलिया यापूर्वी ‘जिगरा’ या चित्रपटात दिसून आली होती. आलिया पुढील काळात ‘अल्फा’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती शर्वरी वाघसोबत झळकणार आहे. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्री अॅक्शन दृश्यं करताना दिसून येणार आहेत.