For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

` तुंबाड 2’मध्ये झळकणार आलिया

06:28 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
  तुंबाड 2’मध्ये झळकणार आलिया
Advertisement

तुंबाड 3 मध्ये मुख्य भूमिका निश्चित

Advertisement

आलिया भट्ट पीरियड हॉरर ड्रामा तुंबाडच्या सीक्वेलचा हिस्सा ठरणार असल्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरू होती. ट्रिलॉजीच्या दुसऱ्या चित्रपटात आलियाचा कॅमियो असेल तर तिसऱ्या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असणार आहे. आलिया भट्ट खरोखरच सोहम शाहच्या चित्रपटाचा हिस्सा ठरणार आहे. आलिया ही तुंबाड 2 मध्ये कॅमियो भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिची भूमिका छोटी असेल परंतु ती मोठा प्रभाव पाडणार आहे. जी तुंबाड 3 शी कनेक्ट करेल आणि त्यात आलिया मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तुंबाड 2 मध्ये स्वत:च्या कॅमियोसाठी आलिया 15 दिवसांचे चित्रिकरण करणार आहे. ही भूमिका चित्रपटाच्या पूर्ण कहाणीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच ही भूमिका तिसऱ्या भागात आणखी पुढे जाणार आहे. या चित्रपटात आलियासोबत सोहम शाह मुख्य भूमिकेत असणार आहे.

आदेश प्रसादच्या दिग्दर्शनात तयार होणारा तुंबाड 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यानंतर तिसऱ्या चित्रपटाची तयारी सुरू होणार आहे. आलियाकडे सध्या यावेळी अनेक बिगबजेट चित्रपट आहेत. ती संजय लीला भंसाळीच्या लव अँड वॉर या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर शर्वरी वाघसोबत ती ‘अल्फा’ या स्पाय थ्रिलरमध्ये काम करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.