For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया-शर्वरी

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया शर्वरी

शिव रवैल करणार दिग्दर्शन

Advertisement

आदित्य चोप्रा यशराज फिल्म्सच्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सची पहिली फीमेल लीड स्पाय फिल्म निर्माण करणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल करणार आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि ऋतिक रोशन यासारखे सुपरस्टार देखील या चित्रपटाचा हिस्सा असणार आहेत. हा चित्रपट अॅक्शनने नटलेला असणार आहे. आलिया आणि शर्वरी दोघीही स्वत:च्या अॅक्शन दृश्यांसाठी तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेणार आहेत. यात मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षणही सामील असणार आहे. हा चित्रपट बिगबजेट असल्याने याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आलिया आणि शर्वरी या चित्रपटाचे चित्रिकरण मे महिन्यात मुंबई येथे सुरू करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण विदेशातही पार पडणार आहे. हा आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्समधील आठवा चित्रपट असणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.