For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्यांदाच जमणार आलिया अन् राजकुमारची जोडी

07:00 AM Apr 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
पहिल्यांदाच जमणार आलिया अन् राजकुमारची जोडी
Advertisement

वर्तमान काळात आलिया भट्ट आणि राजकुमार राव हे बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहेत. आगामी काळात या दोघांची जोडी एका रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसून येणार असून याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहे. अभिषेक पाठक एक प्रेमकथा घेऊन येत असून याचे नाव ‘हाउसवाइफ’ असणार आहे. या चित्रपटात आलिया आणि राजकुमार मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. चित्रपटाची कहाणी विवाहाच्या बदलत्या नात्यांभवती गुंफण्यात आली असून ज्यात सद्यकाळात महिलांच्या भूमिकेत होत असलेल्या बदलांवर जोर देण्यात येणार आहे. याचबरोबर कौटुंबिक जीवन आणि त्याच्या आव्हानांनाही कहाणीत स्थान असणार आहे. अभिषेक पाठक यांनी यापूर्वी दृश्यम 2 चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर हाउसवाइफ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच राजकुमार आणि आलिया एकत्र काम करणार आहेत. राजकुमार राव आगामी काळात टोस्टर या चित्रपटात दिसून येणार आहे. तर आलिया भट्ट ही दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव अँड वॉर’मध्ये दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.