‘बर्ड्स ऑफ प्रे’ फेम अली वोंग घेणार घटस्फोट
9 वर्षांपूर्वी झाला होता विवाह
अभिनेत्री-कॉमेडियन अली वोंगने पती जस्टिन हकुतासोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तिने विभक्त होण्याच्या दोन वर्षांनी बेवर्ली हिल्समध्ये अर्ज दाखल केला आहे. तसेच तीव्र मतभेद असल्याचा दाखला दिला आहे. अली वोंग आणि हकुताने 9 वर्षांपूर्वी विवाह केला होता. दोघांनाही दोन मुली आहेत.
41 वर्षीय वोंगने स्वत:च्या विवाहापूर्वीचा करार लागू करण्याची मागणी केली आहे. सध्या दोघांची मालमत्ता आणि मुलींच्या ताब्यावरून निर्णय घेतला जात आहे. दोघांनीही 2014 मध्ये विवाह केला होता. या जोडप्याला आता 8 वर्षीय मारी अणि 6 वर्षीय निक्की अशा मुली आहेत. अली वोंगने स्वत:च्या मुलींच्या संयुक्त ताब्याची विनंती केली आहे. विभक्त होण्याची कथित तारीख 10 एप्रिल 2022 असल्याचे सांगण्यात आले.
अली वोंग आणि हकुता हे अद्याप चांगले मित्र आहेत. दोघेही सहमतीने घटस्फोट घेत आहेत. दोघांची भेट 2010 मध्ये एका सोहळ्यात झाली होती. वोंगने अनेक टीव्ही शोंमध्ये काम केले आहे. तर हकुता हा एक उद्योजक आहे.