‘राख’ सीरिजमध्ये अली फजल
अभिनेता अली फजलने आतापर्यंत अनेक वेबसीरिजमधील स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो आता पुन्हा नव्या वेबसीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अली फजल हा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. सीरिजची कहाणी थ्रिल आणि सस्पेंसनने भरपूर असून जी गुन्हे आणि न्यायाच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. एंडेमोलशाइन इंडिया आणि गुलबदन टॉकीजच्या बॅनर अंतर्गत ही सीरिज सायकोलॉजिकल थ्रिलर स्वरुपाची असेल.
या सीरिजचे नाव ‘राख’ आहे. या सीरिजचे दिग्दर्शन प्रोसित रॉय करत असून याला अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी दिग्दर्शित केले आहे. सीरिजमध्ये अली फजल आणि सोनाली बेंद्रे तसेच आमिर बशीर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सोनाली बेंद्रेचा दमदार अभिनय यात पाहता येणार आहे.
या सीरिजचे पोस्टर शेअर करण्यात आले असून यात अली फजल पोलीस व्हॅनसमोर इंटेंस मूडमध्ये उभा असल्याचे दिसून येते. तर याच्या कॅप्शनदाखल ‘न्याय राख से उठेगा’ असे लिहिले गेले आहे. अली फजलची ही वेबसीरिज पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. अली फजल पुढील काळात रणवीर सिंहचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘धुरंधर’मध्येही दिसून येणार आहे.