For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अली फजल अन् ऋचा एकत्र झळकणार

06:13 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अली फजल अन् ऋचा  एकत्र झळकणार
Advertisement

बॉलिवूड कपल अली फजल अन् ऋचा चड्ढा पहिल्यांदाच चित्रपटात जोडप्याच्या स्वरुपात दिसून येणार आहे. रियल लाइफची ही जोडी मोठ्या पडद्यावरही एका जोडीच्या रुपात दिसून येणार आहे. या दोघांनी यापूर्वी ‘फुकरे’ फ्रेंचाइजीमध्ये एकत्र काम केले असले तरीही त्यांची त्यात जोडी दर्शविण्यात आली नव्हती. अभिनेता-लेखक-दिग्दर्शक शशी वर्मा याच्या आगामी चित्रपटात हे दांपत्य एकत्र दिसून येणार आहे.

Advertisement

अली अन् ऋचा अखेर पहिल्यांदाच एकत्र सिच्युएल कॉमेडी चित्रपटात काम करणार असून याची निर्मिती सीनवर्क प्रॉडक्शन्स आणि गिरिराज प्रॉडक्शन्स करणार आहे. याचबरोबर चित्रपटात कुमुद मिश्रा देखील दिसून येणार आहेत. दिल्लीतील धावपळयुक्त जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी वर्मा करणार आहे. शशी वर्मा यांनी यापूर्वी ‘बाला’, ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘कटहल’ यासारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. चांगली कॉमेडी प्रामाणिक व्यक्तिरेखा आणि खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या स्थितींमुळे निर्माण होते. याची पटकथा वाचताच यात काही खास असल्याची जाणीव झाली. ऋचासोबत पडद्यावर नवा ताळमेळ आजमाविणे देखील रोमांचक असल्याचे अलीने म्हटले.

Advertisement
Advertisement
Tags :

.