महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅलेक्साचे अमेरिकन ओपनमधून व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण

06:50 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

एनसीएए चॅम्पियन अॅलेक्सा नॉएलचे व्यावसायिक टेनिसपटू म्हणून पदार्पण पुढील आठवड्यात अमेरिकन ओपनमध्ये होणार आहे. तिने पहिल्यांदा हातात रॅकेट धरल्यानंतर दशकभराने हा बदल घडत आहे. सध्या 21 वर्षांच्या असलेल्या या अमेरिकन टेनिसपटूला अजूनही आठवते की, जेव्हा ती 11 वर्षांची होती तेव्हा तिला वर्षाची ही शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा ज्या ठिकाणी होणार आहे त्या स्थळी अमेरिकी टेनिस संघटनेने  घेतलेल्या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

Advertisement

‘त्यांनी आम्हाला आर्थर अॅश स्टेडियममधील कोर्टवर उभे राहू दिले होते’, असे नॉएलने मुलाखतीत सांगितले. त्यावेळी मला खूप छान वाटले आणि मला एक दिवस येथे पोहोचायचे आहे, असाही विचार माझ्या मनात आला, असे ती म्हणाली. नॉएलने मे महिन्यात मियामी विद्यापीठासाठी कनिष्ठ खेळाडू म्हणून विजेतेपद जिंकून आपल्या पहिल्या ग्रॅडस्लॅम स्पर्धेचे एकेरी विभागातील तिकीट मिळविले. त्याच महिन्यात तिने समाजशास्त्रातील पदवी प्राप्त केली. व्यावसायिक खेळाडू बनण्यासाठी तिने एनसीएए पात्रतेच्या अंतिम वर्षाचा त्याग केला असून गुऊवारचा ड्रॉ तिचा पहिला प्रतिस्पर्धी ठरवेल.

‘ती तयार आहे. ती एक आत्मविश्वासपूर्ण खेळाडू आहे आणि तिला आव्हाने आवडतात, असे तिचे प्रशिक्षक लोरेन्झो कावा म्हणाले. ते यापूर्वी 2020 मधील ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफिया केनिनसोबत काम करायचे. विम्बल्डनच्या कनिष्ठ विभागातील फायनलमध्ये पोहोचून वयाच्या 16 व्या वर्षी आपले कौशल्य दाखविलेल्या नॉएलला आता व्यावसायिक स्तरावर जाण्यापूर्वी कॉलेजमध्ये गेलेल्या आणि अलीकडच्या काळात यशस्वी ठरलेल्या खेळाडूंच्या पावलांवर पाऊल ठेवायचे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article