क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी अॅपद्वारे मिळतोय अलर्ट
इस्रायलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होतोय वापर
इस्रायल आणि इराणदरम्यान युद्ध जारी आहे. दोन्ही देश परस्परांवर हल्ले करत आहेत. तर इस्रायलने इराणच्या हल्ल्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना वाचविण्यासाठी एक खास प्रणाली तयार केली आहे. यामुळे तेथील स्थानिक लोकांना मोबाइलमध्ये रियल टाइम अलर्ट मिळतो. यामुळे ते हल्ल्यापूर्वी शेल्टरमध्ये जात स्वत:चा जीव वाचवू शकतात. इस्रायली डेव्हलपर्सनी लोकांच्या सुरक्षेसाठी एक अँड्रॉइड आणि आयओएससाठी खास अॅप्स तयार केले असून ते लोकेशन बेस्ड अलर्ट आणि सेफ्टी गाइडलाइन्स जारी करतात. ही माहिती लोकांपर्यंत मोबाइल अॅपद्वारे पोहोचते आणि मोबाइलवर तीव्र अलर्ट वाजू लागतो. हे मोबाइल अॅप्स लोकांच्या सुरक्षेकरता उपयुक्त ठरले आहेत. या अॅप्सचे नाव रेड अलर्ट, होम फ्रंट कमांड अॅप्स आणि त्झोफार-रेड अलर्ट आहे. बहुतांश अॅप्स थर्ड पार्टी डेव्हलपर्सची असून तर होम फ्रंड कमांड अधिकृत अॅप असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही मिनिटांपूर्वी मिळतो अलर्ट
दोन्ही अॅप्स आयओएस आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर लोकांसाठी उपलब्ध आहेत. रेड अलर्ट अॅप 2-3 मिनिटांपूर्वी माहिती देतो आणि अनेकदा काही लोकेशनवर 10 मिनिटांपूर्वी माहिती मिळते.
कुठून मिळतो डाटा
आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग आणि अॅरो यासारख्या इस्रायली क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणांकडून देखील अॅपला डाटा मिळतो. क्षेपणास्त्राची ट्रेजेक्टी काय आहे आणि ते कोणत्या ठिकाणी कोसळणार, याची माहिती रडार डाटाद्वारे रियल टाइममध्ये मिळते. इराणने क्षेपणास्त्र डागल्यावर आणि ते इस्रायलच्या हवाईक्षेत्रात दाखल होताच इस्रायलच्या सर्व हवाई सुरक्षा यंत्रणा सक्रीय होतात आणि या अॅप्समध्ये नोटिफिकेशन येण्यास सुरुवात होते. परंतु या नोटिफिकेशन्स 100 टक्के अचूक नसतात. परंतु हल्ल्यापूर्वी लोकांना सतर्क करतात.
रेड अलर्ट अॅप : या अॅपमध्ये अनेक खास फीचर्स दिसून येतात. हा अॅप इन्स्टंट नोटिफिकेशन देतो. हा ऑफिशियल सोर्सकडून माहिती मिळवितो आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवितो. हा अॅप लोकांचा जीव वाचविण्याचे काम करतो.
-लोकेशन बेस्ड अलर्ट : रेड अलर्ट अॅपकडून युजर्सना लोकेशन बेस्ड अलर्ट दिला जातो. याचबरोबर आसपासच्या लोकेशनवर एखादे क्षेपणास्त्र कोसळत असल्यास किंवा तेथून झेपावत असल्यास त्याची माहिती अॅपवर पाहिली जाऊ शकते.
कस्टमाइज्ड करता येतो आवाज : रेड अलर्ट अॅपवर युजर्स स्वत:च्या गरजनुसार आवाजाला कस्टमाइज्ड करु शकतात. तसेच आवाजाची पातळी नियंत्रित करता येते. यामुळे तेथील लोकांना फायदा होतो.
आय अॅम सेफ फीचर : रेड अलर्ट अॅपमध्ये आय अॅम सेफ अत्यंत उपयुक्त फीचर आहे. कुठल्याही ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास अशा स्थितीत सरकार आणि स्थानिक प्रशासनापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी आय अॅम सेफ फीचर देण्यात आले आहे. यामुळे संबंधितांकडे लवकर मदत पोहोचू शकते. हे तुमच्या कॉन्टॅक्ट्ससोबत तपशील शेअर करण्याचे काम करते.
शासकीय यंत्रणेशी कनेक्शन नाही : रेड अलर्ट अॅप्सचे कनेक्शन तेथील स्थानिक सरकारशी थेट नाही. परंतु हा अॅप अधिकृत डाटाच दाखवितो, जो संबंधित यंत्रणा पुरवित असतात.