For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युपीआय वापरकर्त्यांना ‘एनपीसीआय’कडून अलर्ट

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
युपीआय वापरकर्त्यांना ‘एनपीसीआय’कडून अलर्ट
Advertisement

वर्षभर व्यवहार न केल्यास आयडी होणार बंद

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘युपीआय’बाबत काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ‘युपीआय’ चालवणाऱ्या संस्थेने फोनपे आणि गुगल पे सारख्या तृतीय पक्ष अॅप्स आणि बँकांना सतर्क करत गेल्या वर्षभरात कोणताही व्यवहार न झालेल्या वापरकर्त्यांचा ‘युपीआय’ आयडी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी एनपीसीआयने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, युपीआय बंद करण्याची कारवाई करण्यापूर्वी वापरकर्त्यांना ईमेल किंवा संदेशाद्वारे सूचना पाठविण्यास सांगितले आहे. ‘एनपीसीआय’च्या या पावलामुळे युपीआय व्यवहार अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अनेक चुकीचे व्यवहारही थांबतील. सूचनांनंतर, आता सर्व अॅप्स आणि बँका निष्क्रिय ग्राहकांचा युपीआय आयडी आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबरची पडताळणी करतील. त्यानुसार गेल्या वर्षभराच्या कालावधीत एकही व्रेडिट किंवा डेबिट व्यवहार नसल्यास युपीआय आयडी बंद होईल. वर्षभर युपीआय आयडीचा वापर न झाल्यास तो बंद केला जाईल. नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीवरून व्यवहार करता येणार नाहीत. ‘एनपीसीआय’कडे चुकीच्या व्यवहारांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.