For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य परीक्षणानंतरच मद्य

07:00 AM Feb 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य परीक्षणानंतरच मद्य
Advertisement

मद्यपान आणि आरोग्य यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. प्रमाणाबाहेर मद्यपान, म्हणजे अनारोग्याला निमंत्रण असते. खरे तर मद्यप्राशन करुच नये, असे आधुनिक वैद्यकशास्त्राचे म्हणणे आहे. पण मद्यपी ते मानत नाहीत. नंतर प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्या की पुढचे आयुष्य अनेक प्रकारच्या निर्बंधांच्या चौकटीत घालवावे लागते. त्यामुळे आता अनेक देशांमध्ये मद्यपानाविरोधात जगजागृती करण्याच्या योजना आणल्या जात आहेत. चीनमधील एका बारने या संदर्भात एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून तो अनुकरणीय असल्याचे दिसून येत आहे. चीनमधील शांघाय शहरात ‘नियांग किंग’ नामक बार उघडण्यात आला आहे. या बारमध्ये मद्य पिण्याची सोय आहे. तथापि, मद्य प्राशन करण्याआधी प्रत्येकाला डॉक्टरांकडून प्रकृती प्रमाणपत्र मिळवावे लागते. नाडीचे ठोके तपासून घ्यावे लागतात. डॉक्टरांनी अनुमती दिली, तरच या बारमध्ये मद्य पुरविले जाते.

Advertisement

तसेच, कोणत्या प्रकारचे मद्य कोणी प्राशन करावे, यासंदर्भातही या बारच्या व्यवस्थापनाकडून डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. डॉक्टरांशी विचारविमर्श करुन या बारने एक विशेष ‘हेल्थ कॉकटेल’ निर्माण केले असून ते ग्राहकांना सर्व केले जाते. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या त्याच्या प्रकृतीमानानुसार हे कॉकटेल देले जाते. अशा प्रकारे आपल्या मद्यप्राशक ग्राहकांच्या प्रकृतीचीही निगा राखणारा हा जगातील प्रथमच बार असावा, अशी चर्चा आहे. शांघायमधील युवकांनी या बारची माहिती सोशल मिडियावर प्रसारित केली आहे. या बारमध्ये पारंपरिक चीनी डॉक्टर्स येतात. ते प्रत्येक मद्यग्राहकाच्या नाडीचे ठोके आणि त्याची जीभ तपासतात. सर्वकाही ठीकठाक असेल, तरच त्यांना मद्य देण्याची अनुमती ते देतात. त्याचप्रमाणे या मद्यात काही औषधी वनस्पतींचा रस मिसळला जातो. त्यामुळे मद्यातील दोषयुक्त भाग सौम्य होतो, असे मानले जाते. अशा प्रकारे या मद्यापासून हेल्थ कॉकटेल बनविले जाते. ते ग्राहकांना पुरविले जाते. मद्यप्राशनामुळे होणाऱ्या प्रकृतीच्या विनाशाला अशा प्रकारे रोखले जाते, असे या बारच्या व्यवस्थपकांचे म्हणणे आहे. हा बार त्यामुळे मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे या बारमध्ये ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होते. अन्य बारही अनुकरण करणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.