For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरीरात आपोआप तयार होते मद्य

06:10 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
शरीरात आपोआप तयार होते मद्य
Advertisement

नशा पूर्ण बाटलीपेक्षा असतो अधिक

Advertisement

मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक असते. याचमुळे प्रत्येक समजुतदार व्यक्ती मद्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतो. परंतु जर मद्य आपोआप शरीराच्या आत तयार होऊ लागले तर काय घडेल? केवळ मद्य तयार होत नाही तर त्यापासून धोकादायक नशा होऊ लागल्यास काय? हे प्रत्यक्षात घडत आहे. या पृथ्वीवर काही अशी माणसं आहेत, ज्यांच्या शरीरात मद्य निर्माण होते आणि त्यामुळे त्यांना नशा देखील होते.

शरीराच्या आत मद्य निर्माण होण्याचे कारण एक दुर्लभ आजार आहे. या आजाराला ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम म्हटले जाते. हा अत्यंत दुर्लभ आजार असून यात व्यक्तीचे शरीर स्वत:च्या आत आपोआप मद्य (एथेनॉल) तयार करू लागते. याला गट फर्मेंटेशन सिंड्रोम म्हणूनही ओळखले जाते.या आजाराच्या काळात शरीरात असलेले कार्बोहायड्रेट किंवा शर्करेत असलेले कण, खमीर (यीस्ट)सोबत क्रिया करून एथेनॉलमध्ये बदलून जातात. यामुळे शरीरात एथेनॉल म्हणजेच मद्य तयार होऊ लागते. याचमुळे आजारी व्यक्ती मद्याच्या नशेत राहतो.

Advertisement

ऑटो-ब्रूअरी सिंड्रोमची प्रक्रिया व्यक्तीच्या पचनतंत्राच्या आत होते. जेव्हा एखादी व्यक्ती अन्न ग्रहण करते, खासकरून जर हे अन्य कार्बोहायड्रेटने भरपूर असेल तर त्याच्या पचनतंत्रात असलेले खमीर किंवा फंगस या घटकांना मद्यात बदलू लागते. सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया छोटे आतडे आणि मोठ्या आतड्यात घडत असते.

शरीरात असलेल्या खमीरचा प्रकार हा बियर आणि अन्य अल्कोहोलिक ड्रिंक्स निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकारातील असतो. आतड्यात मद्य निर्माण झाल्यावर ते रक्तात मिसळते आणि माणूस दिवसभर नशेत राहतो. अलिकडेच बेल्जियममध्ये एक असाच रुग्ण  आढळून आला आहे. एक व्यक्ती ऑटो-ब्dरूअरी सिंड्रोमने ग्रस्त होता आणि त्याच्या शरीरात आपोआप मद्य निर्माण होत होते.

Advertisement
Tags :

.