For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दारूची नशा करी आयुष्याची दशा !

06:47 AM Jun 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
दारूची नशा करी आयुष्याची दशा
Advertisement

काही क्षणांची झिंग अनुभवण्यासाठी गावठी दारू पीत संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी केल्याचा प्रकार म्हणजे पुणे दारू कांड प्रकरण होय. या दारू मुळे मृत्युला तर कवटाळलेच मात्र मागे असलेल्या कुटुंबाची देखील वाताहात झाली. दारू च्या नशेमुळे आयुष्याची होणारी दशा थांबवायची असेल तर दारू बंदी ही काटेकोरपणे अंमलात आणली पाहिजे. तरच अनेकांचे संसार वाचतील.

Advertisement

पुणे दारूकांडामुळे संपूर्ण राज्यच नव्हे तर देश हळहळला. दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तरी देखील न दारू पिणाऱ्यांची संख्या कमी होतेय की ना विकणाऱ्यांची. उलट दाऊमध्ये नफा मिळविण्यासाठी त्यामध्ये भेसळ करीत खुलेआम दारू ची विक्री सुरू आहे. पुणे येथील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दापोडीमध्ये देखील दाऊ विकणाऱ्याने यात मिथेनॉल विषारी रसायनाची भेसळ करीत दाऊ विकल्याने यामध्ये 18 हून अधिक जणांचा नाहक बळी गेला. पोलिसांची कडक गस्त असून देखील गुन्हेगार पोलिसांची नजर चुकवुन गुन्हा करीत असतात. दारू च्या या नशेमुळे पिणाऱ्यांच्या आयुष्याची दशा तर झालीच मात्र त्यांच्यामागे असलेली कुटुंबेदेखील उघड्यावर पडली.

यामध्ये नाहक बळी गेला तो पोलीस दलाचा. यामध्ये पोलीस दलाची काय चुक? अहोरात्रं कितीही गुन्हेगारांवर लक्ष ठेवले तरी गुन्हेगार हा गुन्हा करण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधुन काढतोच. मात्र यामध्ये बळी जातो तो जनतेच्या रक्षकाचा. सर्वच दोषी असतात असे नाही. मात्र ओल्यासंगे सुकेही जळते, तसा हा काहीसा प्रकार. गावठी दाऊ बंदी किवा दाऊ बंदी सारख्या अनेक वल्गना यापूर्वी कऊन झाल्या. मात्र पूर्ण दाऊ बंदी कोणालाच जमली नाही. कारण दारूमुळे महसूल मिळतो. पण दुर्देव म्हणजे यामध्ये अनेक आयुष्य उद्धवस्त होतात त्याचे काय? गावठी दाऊवर अनेक राज्यात बंदी आहे. मात्र ही बंदी केवळ नावासाठी आहे. स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेत खुलेआम गावठी दाऊ विक्रीचा खेळ सुऊ आहे. या दारू पायी कित्येकांच्या आयुष्याची माती झाली आहे. तर कित्येक तरूण गुन्हेगारीकडे वळले आहेत. केवळ गावठी दाऊच नाही तर शहरी भागात दाऊची नशा आणि बारबालांची साथ यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीत वाढ होत असल्याने, ऑगस्ट 2005 साली डान्स बार बंदी लागू करण्यात आली. यामुळे कित्येक गुन्हेगार आणि गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले. पुणे दारूकांड प्रकरणात योगेश वानखेडे याला अटक जरी केली असली तरी पूर्णत: गावठी दारू ला मज्जाव करता आला नाही. पुणे दारू कांड प्रकरण झाल्यामुळे गावठी दाऊ अथवा हातभट्टीच्या दारू चा प्रश्न आताच पुढे नाही आला. तर या गावठी अथवा हातभट्टीच्या दारूला देखील एक रक्तरंजीत इतिहास आहे. तोही अगदी अंडरवर्ल्डपासून. दाऊची किंमत आणि दाऊची तस्करी खऱ्याअर्थाने सुरू केली ती अंडरवर्ल्डमधील लेडी माफियांनी.

Advertisement

अंडरवर्ल्डमधील पहिली लेडी माफिया जेनाबाई दाऊवालीपासून ते मालवणी दाऊकांडातील दाऊ माफिया ममता आणि ग्रेसी आंटीपर्यंत या लेडी माफियांनी एकप्रकारे दबदबा निर्माण केला होता. जून 2015 साली मालवणी विषारी गावठी दारू कांडात 106 जणांचा मृत्यू झाला होता तर 70 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या विषारी गावठी दारू ची तस्करी अथवा माफियागिरी करण्यात ममता आंटी आणि ग्रेसी आंटीचा हात असल्याचे समोर आले होते. झटपट आणि ऐशोआरामात मिळणाऱ्या पैशामुळे दुसऱ्यांचे संसार कितपत उद्ध्वस्त होतायत याचे काही एक सोयरसुतक या दारू माफिया महिलांना नव्हते. दोष त्यांचा नाही, परिस्थिती सर्व काही ओढावते, मात्र या परिस्थितीशी दोन हात कऊन, जो सरळमार्गे यश मिळवतो, ते यश चिरंतन टिकते. अशाच प्रकारे प्रथम गावठी दारू च्या तस्करीमध्ये एण्ट्री केली होती, ती अंडरवर्ल्डमधील पहिली लेडी डॉन असलेल्या जेनाबाई उर्फ झैनाब मेमन हलाई या महिलेने. देशाची फाळणी झाल्यानंतर पती पाकिस्तानला निघून गेला. तर या ठिकाणी पाच मुलांसह एकटी पडलेल्या जेनाबाईवर सर्व जबाबदारी येऊन पडली. प्रथम राशनिंगमध्ये मिळणाऱ्या तांदळाचा व्यवसाय करणाऱ्या जेनाबाईला मुंबईत जेनाबाई चावलवाली या नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र तांदुळाचा अवैध व्यवसाय बंद पडल्याने, जेनाबाई त्याकाळचा गुन्हेगारीतील एकमेव सम्राट वरदाराजन मुदलीयार याच्या साथीने गावठी दारूच्या व्यवसायात उतरली. त्यानंतर जेनाबाई चावलवालीची जेनाबाई दारू वाली बनली.

जेनाबाईचा कार्यकाळ संपतोय ना संपतोय तोच, कामाठीपुऱ्यात एक वादळ उठले होते. परराज्यातून मुलींना फुस लावुन अथवा लग्नाचे आमिष दाखवून फसवून आणत या ठिकाणी विकले जात होते. गुजरात राज्यातील काठियावाड गावातून गंगा नावाच्या मुलीला मुंबईच्या मायानगरीचे आमिष दाखवून या ठिकाणी विकले. यावेळी हेच आपले राज्य याचा स्विकार करीत या गंगाने या ठिकाणी आयुष्य काढण्यास सुऊवात केली. पुढे जाऊन बॉलिवूडने गंगुबाई काठीयावाडी नावाने चित्रपट देखील प्रदर्शित केला. कामाठीपुऱ्यात गंगुबाई कोठेवालीची दहशत निर्माण होत असतानाच रे रोड परिसरातील सोनापूर गल्लीत अंमली पदार्थाच्या विश्वातील ज्योती आदिरालिंगम उर्फ रे रोडची राणी राज्य करीत होती. तिच्या अंमली पदार्थाच्या तस्करीमुळे संपूर्ण पोलीस दल देखील हैराण झाले होते. मादक बोलण्याने ती पोलिसाना गुंगारा देण्यात पटाईत होती. रे रोडची राणी म्हणून नावारू पाला आलेल्या ज्योतीअम्माची या ठिकाणी दहशत होती. तर ज्या सायन कोळीवाड्यात वरदाराजनचा दबदबा होता. त्याच वरदाराजनचा दबदबा नाहीसा झाल्यानंतर आणि सरकारने गावठी दाऊवर बंदी आणल्याने, या ठिकाणाहून लक्ष्मी पापामणी ही अंमली पदार्थाच्या तस्करीचा व्यवसाय करू लागली. सायन कोळीवाडा म्हणजे लक्ष्मी पापामणीचा गढ होता. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तस्करीमुळे पापामणी गब्बर झाली होती. मात्र जसे दिवस फिरतात तसे वासे देखील फिरतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या विरोधात पोलिसांकडे तिच्या पतीनेच साक्ष दिल्याने लक्ष्मी अडचणीत आली. तर अंमली पदार्थाच्या तस्करीत कोट्यावधीची संपत्ती जमवून बेबी पाटणकर ही लेडी माफिया आजदेखील सुसाट आहे. तर ऑईल माफियात दबदबा निर्माण करणारी लल्लनभाभीचा हात कोणी पकडू शकला नाही. पुणे दारू कांड प्रकरणात केवळ वानखेडेलाच अटक न करता त्याला मिथेनॉल पुरविणाऱ्या तसेच यांना साथ देणाऱ्या समाजकंटकांना देखील वेळीच आवरले पाहिजे.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.