कतार स्पर्धेत अल्कारेझ विजेता
06:55 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ डोहा (कतार)
Advertisement
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील कतार खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अल्कारेझने फिल्सचा 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 50 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत जेतेपद हस्तगत केले. 2026 च्या टेनिस हंगामात अल्कारेझने आपली विजयी घोडदौड कायम राखली असून एटीपी टूरवरील त्याने ही पहिली स्पर्धा जिंकली आहे. अल्कारेझने एटीपी 500 दर्जाच्या स्पर्धेतील हे नववे विजेतेपद मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या टेनिस हंगामात अल्कारेझने क्लेकोर्टवरील स्पर्धेत सलग दोन वेळा आर्थर फिल्सवर विजय मिळविला होता.
Advertisement
Advertisement