For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, व्हेरेव्ह उपउपांत्यपूर्व फेरीत

06:07 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  व्हेरेव्ह उपउपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

 पोलंडची स्वायटेक, कोको गॉफचे आव्हान समाप्त

Advertisement

 वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (अमेरिका)

एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या 1000 दर्जाच्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरी स्पेनचा कार्लोस अल्कारेझ आणि जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र महिला एकेरीत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक आणि अमेरिकेची कोको गॉफ यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

Advertisement

 

या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात टॉप सिडेड अल्कारेझने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात जर्मनीच्या चौथ्या मानांकित व्हेरेव्हने ख्रिस्टोफर युबँक्सचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. अल्कारेझच्या वेगवान आणि अचूक सर्व्हिसच्या जोरावर 37 वर्षीय मोनफिल्सला सरळ सेट्समध्ये हार पत्करावी लागली. 2022 साली अल्कारेझने या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते. आता अल्कारेझचा पुढील फेरीतील सामना इटलीच्या मुसेटीशी होणार आहे. इटलीच्या लोरेंझो मुसेटीने अमेरिकेच्या बेन शेल्टनवर 6-4, 7-6 (7-5) अशी मात करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना 2 तास चालला होता. जर्मनीच्या व्हेरेव्हचा पुढील फेरीतील सामना कॅचेनोव्हशी होणार आहे. 15 व्या मानांकित कॅचेनोव्हने अर्जेंटिनाच्या सेरुन डोलोचा 6-1, 5-7, 7-6 (7-5) असा पराभव केला. बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, पोलंडचा हुरकेझ, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर आणि हंगेरीचा मॅरोझसेन यांनी पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. मात्र ब्रिटनच्या अँडी मरेने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. तिसऱ्या फेरीतील सामन्यात मॅचेकने मरेचा 5-7, 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

महिलांच्या विभागात चौथ्या फेरीतील सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला रशियाच्या इकटेरिना अॅलेक्सेंड्रोव्हाकडून अनपेक्षित हार पत्करावी लागली. अॅलेक्सेंड्रोव्हाने स्वायटेकचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात फ्रान्सच्या गारसियाने टॉप सिडेड कोको गॉफचे आव्हान 7-6 (7-1), 6-3 असे संपुष्टात आणले. ऑलेक्सेंड्रोव्हाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जेसिका पेगुलाशी होणार आहे. पेगुलाने नेव्हारोचा 7-6 (7-1), 6-3 असा पराभव केला. अमेरिकेच्या डॅनेलि कॉलिन्सने सोरेना सिरेस्टीचा 6-3, 6-2, चौथ्या मानांकित इलिना रिबाकीनाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 6-3, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. रिबाकिना आणि इटलीची सॅकेरी यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. कझाकस्तानच्या युलिया पुतिनसेवाने युक्रेनच्या कॅलिनीनावर 6-4, 7-6 (7-5) अशी मात केली.

Advertisement
Tags :

.