अल्कारेझची टेलर फ्रित्झवर मात
06:33 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
Advertisement
रोमांचक सामन्यात टेलर फ्रित्झवर संघर्षपूर्ण विजय मिळवून कार्लोस अल्कारेझने पहिल्या एटीपी फायनल्स जेतेपदाच्या आशा कायम राखल्या.
अव्वल मानांकित स्पॅनिश खेळाडूने एका सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही दोन तास आणि 48 मिनिटे चाललेल्या या रोमांचक सामन्यात फ्रित्झचा 6-7 (2), 7-5, 6-3 असा पराभव केला. गेल्या वर्षीचा उपविजेता फ्रित्झने बराच वेळ सामन्यावर नियंत्रण राखले होते. या हंगामात अल्कारेझवर सलग दुसऱ्यांदा तो विजय मिळवण्याच्या मार्गावर होता. तथापि, 22 वर्षीय स्पॅनिश खेळाडूने उल्लेखनीय धैर्य आणि प्रतिभा दाखवली. अल्कारेझ गुरूवारी मुसेटीविरुद्ध त्याचा शेवटचा राऊंडरॉबिन सामना खेळेल.
Advertisement
Advertisement