स्टॉर्म सीरिजमध्ये अलाया
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन एकीकडे ‘कृष 4’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, तर दुसरीकडे तो लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने एक नवी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘स्टॉर्म’ची घोषणा केली आहे. या प्रोजेक्टसोबत ऋतिक रोशन आणि त्याची कंपनी एचआरएक्स फिल्म्सने हातमिळवणी केली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अजीतपाल सिंह यांनी केले आहे. तर कहाणी अजीतपाल सिंह यांनी फ्रान्स्वा लुनेल आणि स्वाती दास यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. स्टॉर्म सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथू, अलाया एफ, सृष्टी श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद मुख्य भूमिकेत असेल. हा एक रोमांचक थ्रिलर ड्रामा असणार असून याची कहाणी मुंबईवर आधारित असेल. स्टॉर्मने मला ओटीटीच्या जगतात निर्माता म्हणून कारकीर्द सुरू करण्याची आकर्षक संधी दिली आहे. अजीतपालने एक रंजक अन् सत्याने भरलेली कहाणी सादर केली असून ती दमदार असल्याने मी अत्यंत उत्सुक असल्याचे ऋतिकने म्हटले आहे.