For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलास्का ट्रायंगल, 20 हजार लोक गायब

06:24 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अलास्का ट्रायंगल  20 हजार लोक गायब
Advertisement

बरमुडा ट्रायंगल विसरा

Advertisement

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल अनेक प्रकारची रहस्यं आहेत. असेच एक ठिकाण अलास्का ट्रायंगल असून तेथे लोक गायब होतात. मागील 5 दशकांमध्ये येथे सुमारे 20 हजार लोक गायब झाले आहेत.  अलास्का ट्रायंगलवर 1972 मध्ये जगाचे लक्ष गेले. तेव्हा दोन अमेरिकन राजकारण्यांना नेणारे एक छोटे विमान एंकोरेज हून जूनोच्या मार्गात असताना अचानक गायब झाले होते. तेव्हापासून येथे सातत्याने लोक गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हे एक असे स्थान ठरले आहे, जेथे अनुत्तरित राहिलेली सर्वाधिक बेपत्ता प्रकरणे आहेत. दक्षिणेत एंकोरेज आणि उत्तर किनारी शहर उटकियागविक नजीक स्थित अलास्का त्रिभूज 20 हजारांहून अधिक लोक बेपत्ता झाल्याने एक रहस्य ठरला आहे. बरमुडा ट्रायंगलमध्ये लोक गायब होणे जगाला चकित करत राहिले आहे, परंतु आता अलास्का देखील हैराण करत आहे.

1972 मध्ये अमेरिकेतील नेते थॉमस हेल बोग्स सीनियर आणि अलास्काचे काँग्रेसमन निक बेगिच, त्यांचे सहकारी रसेल ब्राउन आणि वैमानिक डॉन जोन्ज हे एंकरेज येथून जूनोसाठी एका विमानातून प्रवास करताना अचानक गायब झाले. चारही जणांना शोधण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले, परंतु अद्याप त्यांचे मृतदेह आणि विमानही सापडलेले नाही. या घटनेने अनेक कॉन्सपिरेसी थेअरींना जन्म दिला, कारण बोग्स हे जॉन केनेडी यांच्या हत्येच्या चौकशीसाठी स्थापन समितीचे सदस्य होते.

Advertisement

याच ठिकाणी कुणी गायब होण्याचे आणखी एक प्रमुख प्रकरण 25 वर्षीय न्यूयॉर्कर गॅरी फ्रँक सोदरडेन यांचे होते. ते 1970 च्या दशकाच्या मध्याला शिकारीसाठी अलास्काच्या जंगलात गेले होते. परंतु कधीच परतले नाहीत. दोन दशकांनी 1997 मध्ये अलास्कामध्ये साही नदीच्या काठावर एक मानवी कवटी मिळाली. 2022 मध्ये तपासणीनंतर ही कवटी सोदरडेन यांची होती असा निष्कर्ष काढण्यात आला. एखाद्या अस्वलाने त्यांचा जीव घेतला असे मानले जाते.

अलास्का ट्रायंगलमध्ये अत्यंत अधिक चुंबकीय हालचाली होतात असे मानले जाते. तर येथे एलियन्स असून ते मानवी अस्तित्व स्वीकारत नसल्याचेही काही जणांचे मानणे आहे. परंतु या ट्रायंगलमध्ये लोक गायब का होतात या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनुत्तरित आहे.

Advertisement
Tags :

.