अल हिलालचा मँचेस्टर सिटीला 4-3 ने धक्का
वृत्तसंस्था/ ओर्लांदो
मार्कोस लिओनार्दोने 112 व्या मिनिटाला रिबाऊंड झालेल्या चेंडूवर आपला दुसरा गोल केला आणि अल हिलालने मँचेस्टर सिटीला 4-3 ने हरवले, ज्यामुळे प्रीमियर लीगमधील एका बलवान संघाची क्लब वर्ल्ड कपमधील वाटचाल उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली आहे.
कॅम्पिंग वर्ल्ड स्टेडियमवर झालेल्या एका रोमांचक सामन्यात सौदी अरेबियाच्या क्लबने तीन वेळा आघाडी घेतली, ज्यामध्ये अतिरिक्त वेळेत दोनदा त्यांनी आघाडी घेतली. कालिदौ कौलिबालीने 94 व्या मिनिटाला अल हिलालला 3-2 अशी आघाडी दिली, परंतु चार मिनिटे आधी बदली खेळाडू म्हणून प्रवेश केलेल्या फिल फोडेनने 104 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. अखेर लिओनार्दोने मँचेस्टर सिटीला स्वप्नांवर पाणी ओतले. गोलकीपर एडरसनने यावेळी पेनल्टी बॉक्समध्ये सर्जेज मिलिंकोविच-साविचचा हेडर निष्फळ ठरविला आणि चेंडू लिओनार्दोकडे वळला, ज्याने उजव्या पायाने तो रिडायरेक्ट केला.
अल हिलालची गाठ आता सोमवारी इंटर मिलानला हरवणाऱ्या इटलीच्या फ्लुमिनेन्स संघाशी 4 जुलै रोजी पडणार आहे. अल हिलालने 46 व्या मिनिटाला गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तत्पूर्वी मॅन सिटीसाठी नवव्या मिनिटाला बर्नार्डो सिल्वनने गोल करून सुऊवात केली. 52 व्या मिनिटाला माल्कमने अल हिलालला आघाडी मिळवून दिली आणि 55 व्या मिनिटाला एर्लिंग हालांडने गोल करून मँचेस्टर सिटीला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.