For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल अहली क्लब एएफसी चॅम्पियन्स लीगचा विजेता

06:08 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल अहली क्लब एएफसी चॅम्पियन्स लीगचा विजेता
Advertisement

वृत्तसंस्था, जेद्दाह

Advertisement

येथे झालेल्या एएफसी चॅम्पियन्स लीग इलाईट फुटबॉल स्पर्धेत सौदी अरेबियाच्या अल अहली क्लबने जेतेपद स्वताकडेच राखले. अंतिम सामन्यात अल अहलीने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविणाऱ्या जपानच्या मचिदा झेल्व्हियाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

हा सामना पाहण्यासाठी सुमारे 60 हजार फुटबॉलशौकिन उपस्थित होते. या सामन्यात अल अहली संघाला उत्तरार्धात 10 खेळाडूंनीशी खेळावे लागले. सामन्यातील एकमेव निर्णायक विजयी गोल अल अहली संघातील सौदीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू फिरास अल बुरीकानने नोंदविला. या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. जपानच्या संघाला गोल करण्याच्या किमान 5 संधी मिळाल्या होत्या. पण अल अहलीच्या भक्कम बचावफळीमुळे तसेच गोलरक्षणामुळे त्यांना शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर अल अहली संघातील झाकारिया हावसावी याला दांडगाईचा खेळ केल्याबद्दल पंचांनी बाहेर काढले.

Advertisement

Advertisement
Tags :

.