अक्षय्य तृतीया उत्साहात साजरी
02:50 PM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : ‘साडेतीन मुहूर्तांपैकी’ एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्सव राज्यात काल रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषत: पणजी आणि आसपासच्या परिसरात धार्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच पणजीतील महालक्ष्मी मंदिर, मारुती मंदिर आणि इतर प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन वस्तू, विशेषत: सोने खरेदीसाठी पणजीतील ज्वेलरी दुकानांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळाली. नवीन गृहप्रकल्प किंवा वाहनांच्या बुकिंगसाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यपाल अशोक पुसापती गजपती राजू आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीयांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या.
Advertisement
Advertisement