अक्षय कुमार पोहोचला महाकुंभ मेळ्यात
प्रयागराज
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील कुंभमेळ्याला जाऊन त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. यामध्ये बॉलीवूड सेटीब्रेटीही सामील आहेत. अशातच आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करून वर्णी लावली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जी यांचे मी आभार मानतो. २०१९ च्या कुंभ मेळ्यापेक्षा यावर्षीच्या महाकुंभमेळ्यामध्ये अत्यंत सुधारणा झालेल्या आहेत. मला २०१९ चा कुंभमेळा अजूनही आठवतो आहे. भारतातील अनेक नामांकीत लोकांनी या कुंभ मेळ्याला भेटी दिल्या आहेत. त्यावरूनच लक्षात येतयं की यावर्षीच्या महाकुंभमेळाव्यातील व्यवस्थापन अतिशय स्तुत्य आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेता अक्षय कुमारने यावेळी दिली.
पुढे अभिनेता अक्षयकुमार म्हणाले, मी या महाकुंभमेळ्यातील सर्व सुरक्षा रक्षक, अधिकारी सर्वांचे विशेष आभार मानतो.
२००५ च्या महाकुंभमेळ्यातील शेवटचे पवित्र स्नान २६ फेब्रुवारी रोजी होणार असून या दिवशी महाशिवरात्रीही आहे. महाकुंभमेळ्यात विकी कौशल, राजकुमार राव, बोनी कपूर, सोनाली बेंद्रे अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी या पवित्र स्नानाचा अनुभव घेतला आहे.