कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पिच टू गेट रिच’मध्ये अक्षय कुमार

06:37 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओटीटीवर अभिनेत्याचे पदार्पण

Advertisement

अक्षय कुमार आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. अक्षय फॅशन बेस्ड रिअॅलिटी शो ‘पिच टू गेट रिच’मध्ये जज आणि इन्व्हेस्टर म्हणून दिसून येणार आहे. नव्या फॅशन स्टार्टअपला जागतिक पातळीपर्यंत पोहोचविणारा हा शो असल्याचा दावा करण्यात येत आहे. माझ्या परिवारात माझी सासू आणि पत्नी फॅशनमध्ये अत्यंत रुची बाळगणारी आहे. परंतु मी पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाच्या पँटमध्ये अत्यंत आनंदी असतो, ट्रॅक पँटमध्ये मी आनंदी राहतो, पण फॅशनच्या जगतात जितके टॅलेंट आहे, तितकेच आकर्षण  फॅशन बिझनेसविषयी जाणून माझ्यात निर्माण झाल्याचे अक्षय सांगतो.

Advertisement

फॅशन इंडस्ट्रीचा वर्षातील बिझनेस 9 लाख कोटीचा आहे, तर आमची चित्रपटसृष्टी वर्षाकाठी केवळ 15 हजार कोटींचा व्यवसाय करते. याचमुळे मला या शोची कल्पना अत्यंत आवडली, ज्यात फॅशनच्या जगतातील नव्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आम्ही त्यांच्या व्यवसायाला ग्लोबल स्वरुप मिळवून देऊ असे अक्षयने म्हटले आहे. पिच टू गेट रिच या शोमध्ये नव्या कंपन्यांना संधी मिळेल. मी चित्रपटसृष्टीत नेहमीच नव्या लोकांना पाठिंबा दिला आहे. मी 23 नवे दिग्दर्शक आणि 26 नवोदित अभिनेत्रींसोबत काम केले आहे. निश्चितपणे मी अधिक मेहनत करताहे, पैशांसाठी काम करतो, परंतु माझ्यासाठी संपत्तीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मानसिक शांती असल्याचे अक्षयने म्हटले आहे. करण जौहरच्या बॅनरच्या या शोमध्ये 13 स्टार्टअप स्पर्धा करतील, ज्यात 8 पुरुष, 2 महिला आणि 3 मेल-फीमेल फाउंडर आहेत. या शोची अन्य जज आणि इन्व्हेस्टर असलेली मलायका अरोराने माझा स्वत:चा एक ऑनलाइन स्टार्टअप असून तो पूर्णपणे महिलांसाठी असल्याचे सांगितले आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article