For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षरयात्रा राशीभविष्य

06:12 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
अक्षरयात्रा राशीभविष्य
Advertisement

26 जुलै ते 1 ऑगस्ट

Advertisement

मेष

या आठवड्यात तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळेल. नोकरी व व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. आर्थिक बाबतीत संयम ठेवा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. गुऊपौर्णिमेच्या निमित्ताने नवीन ज्ञान आत्मसात करण्याचा संकल्प करा.

Advertisement

उपाय: गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु किंवा ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्या.

वृषभ

या आठवड्यात आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि जुने संपर्क उपयोगी ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगती होईल. संयम आणि सातत्य यामुळे अपेक्षित यश मिळेल. गुऊंच्या मार्गदर्शनामुळे योग्य दिशा मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: गुरु पौर्णिमेला पिवळे फळ किंवा हरभरा डाळ दान करा.

मिथुन

या आठवड्यात संवाद कौशल्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात चांगले व्यवहार होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याचा आदर करा. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

उपाय: गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या आध्यात्मिक किंवा प्रेरणादायी ग्रंथाचे वाचन सुरू करा.

कर्क

या आठवड्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. नोकरीत मेहनतीचे फळ मिळेल. भावनिक निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक पावले उचला. गुऊजनांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

उपाय: गुरु पौर्णिमेला गुरु किंवा आई-वडिलांना एखादी छोटी भेट किंवा फळ अर्पण करा.

सिंह

नेतृत्वगुणांमुळे कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. आर्थिक लाभाची शक्मयता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अहंकार बाजूला ठेवून अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन स्वीकारल्यास अधिक यश मिळेल.

उपाय: गुरुपौर्णिमेला ‘ॐ गुरवे नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करा.

कन्या

कामातील अचूकता आणि शिस्त यामुळे मोठा लाभ होईल. कार्यालयात कौतुक मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एखाद्या शिक्षक किंवा मार्गदर्शकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने मानसिक समाधान मिळेल.

उपाय: गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांना किंवा गरजू व्यक्तीला शैक्षणिक साहित्य दान करा.

तुळ

भागीदारीच्या कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात समंजसपणा वाढेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. शांत स्वभाव आणि योग्य मार्गदर्शनामुळे अडचणी दूर होतील.

उपाय: गुरुपौर्णिमेला एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा.

वृश्चिक

या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक कामे सहज पूर्ण होतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.

उपाय: गुरुपौर्णिमेला पिवळ्या फुलांनी गुरु किंवा देवतांची पूजा करा.

धनु

प्रगतीसाठी हा उत्तम आठवडा आहे. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुऊंच्या कृपेने योग्य निर्णय घेता येतील.

उपाय: गुरु पौर्णिमेला ‘ॐ बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा जप करा.

मकर

संयम आणि शिस्त यामुळे कार्यक्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या सहज पार पडतील. अनुभवातून शिकण्याची वृत्ती ठेवली तर प्रगती निश्चित आहे.

उपाय: गुरु पौर्णिमेला गरजू विद्यार्थ्याला वही किंवा पेन भेट द्या.

कुंभ

सर्जनशीलतेमुळे नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती राहील. ज्ञानवृद्धीसाठी हा उत्तम काळ आहे. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा.

उपाय: गुरुपौर्णिमेला एखादे आध्यात्मिक किंवा प्रेरणादायी पुस्तक वाचण्याचा संकल्प करा.

मीन

श्र्रद्धा आणि संयमामुळे अडथळ्यांवर मात कराल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभाग लाभदायक ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. गुऊंच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढेल.

उपाय: गुरु पौर्णिमेला पिवळ्या वस्तूंचे दान करून गुऊंचे स्मरण करा.

सर्व राशींसाठी समान उपाय

गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु , आई-वडील किंवा जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. ‘ॐ गुरवे नम:’ किंवा ‘ॐ बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्मय असल्यास पिवळी फळे, हरभरा डाळ किंवा हळद दान करा. कृतज्ञतेने केलेली ही साधना ज्ञान, योग्य निर्णयक्षमता आणि जीवनातील प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते.

Advertisement
Tags :

.