For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षरयात्रा राशिभविष्य

06:05 AM May 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
अक्षरयात्रा राशिभविष्य
Advertisement

 17.5.2026 ते 23.5.2026 पर्यंत

Advertisement

मेष

तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना येतील आणि त्यातील एखादी गोष्ट पुढे मोठी संधी बनू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास लोकांना जाणवेल. एखाद्या जुन्या व्यक्तीकडून अचानक संपर्क येऊ शकतो. पैशांबाबत थोडा विचार करून निर्णय घ्या कारण अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. नातेसंबंधात तुमचे स्पष्ट बोलणे महत्त्वाचे ठरेल. स्वत:साठी थोडा वेळ काढलात तर मानसिक शांतता मिळेल.

Advertisement

उपाय: या आठवड्यात तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात एक छोटी चांदीची वस्तू ठेवा.

वृषभ

तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि शांतता जाणवेल. काही गोष्टी ज्या अडकल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू लागतील. घरातील वातावरण आनंदी राहील. कामात एखादी जबाबदारी वाढू शकते पण त्यातूनच तुम्हाला कौतुक मिळेल. प्रेमसंबंधात एखादी गोड चर्चा मन प्रसन्न करेल. पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते.

उपाय: या आठवड्यात रात्री झोपण्यापूर्वी थोडा केशराचा सुगंध हाताला लावा.

मिथुन

या आठवड्यात तुमची बोलण्याची कला लोकांना प्रभावित करेल. सोशल मीडिया, मार्केटिंग किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. एखादी अचानक भेट किंवा छोटा प्रवास आनंद देईल. काही लोक तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे प्रत्येकाशी सर्व गोष्टी शेअर करू नका. मनात सुरू असलेला गोंधळ आता कमी होईल.

उपाय: या आठवड्यात मोबाईलच्या कव्हरमध्ये एक छोटासा हिरवा कागद ठेवा.

कर्क

भावना जास्त तीव्र राहतील आणि तुम्ही लोकांच्या वागण्याचा खोलवर विचार करू शकता. घर, कुटुंब आणि भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबतीत एखादी संधी मिळू शकते. कोणाच्या शब्दांमुळे मन दुखावू देऊ नका. स्वत:च्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा कारण ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

उपाय: या आठवड्यात चंद्र दिसल्यावर दोन मिनिटे शांतपणे तुमची इच्छा मनात बोला.

सिंह

लोकांचे लक्ष तुमच्याकडे राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि कामामुळे तुम्हाला वेगळी ओळख मिळू शकते. काही लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. एखाद्या मोठ्या निर्णयाबद्दल विचार सुरू होऊ शकतो. खर्च वाढू शकतो पण त्याचबरोबर एखादा चांगला लाभही मिळेल. प्रेम आणि मैत्रीत प्रामाणिकपणा महत्त्वाचा राहील.

उपाय:  आरशासमोर उभे राहून रोज सकाळी स्वत:ला एक चांगली गोष्ट बोला

कन्या

या आठवड्यात तुम्ही खूप विचार कराल पण प्रत्येक गोष्टीवर जास्त विचार करू नका. कामात काही सुधारणा करण्याची इच्छा होईल. एखादी नवीन योजना किंवा कल्पना पुढे जाऊ शकते. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुमची मेहनत आता दिसू लागेल.

उपाय:  तुमच्या कामाच्या टेबलावर रोज एक छोटी सुगंधी फुलांची पाकळी ठेवा.

तुळ

या आठवड्यात नातेसंबंध आणि भागिदारीवर  जास्त लक्ष राहील. एखादी व्यक्ती तुमच्याशी मन मोकळं करू शकते. तुमचे आकर्षण आणि संवाद लोकांना जवळ आणेल. पैशांच्या बाबतीत एखादा विचारपूर्वक निर्णय फायदेशीर ठरेल. जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. स्वत:वर विश्वास ठेवा.

उपाय: या आठवड्यात एका छोट्याशा गुलाबी कागदावर तुमची इच्छा लिहून पर्समध्ये ठेवा.

वृश्चिक

या आठवड्यात तुमची intuition खूप strong राहील. एखादी गोष्ट आधीच जाणवल्यासारखी वाटेल. गुप्तपणे सुरू असलेली एखादी योजना यशस्वी होऊ शकते. काही लोक तुमच्याबद्दल उत्सुक राहतील. प्रेमात emotional clarity मिळेल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहणे योग्य ठरेल.

उपाय: या आठवड्यात काळ्या रंगाची छोटी वस्तू तुमच्याजवळ ठेवा.

धनु

नवीन अनुभव आणि नवीन लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. प्रवास,learning  किंवा career मध्ये काहीexciting घडू शकते. तुमच्या मनात मोठे ज्त्aहे तयार होतील. एखादी चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. काही गोष्टी उशिरा मिळतील पण योग्य वेळी मिळतील.

उपाय: या आठवड्यात घरातून बाहेर पडताना थोडासा वेलदोड्याचा सुगंध घ्या.

मकर

मेहनतीचे फळ दिसू लागेल. काही काळापासून सुरू असलेला ताण आता कमी होईल. वरिष्ठांकडून appreciation  मिळण्याची शक्यता आहे. पैशांबाबत एखादा practical निर्णय फायद्याचा ठरेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे मनाला शांतता देईल.

उपाय: या आठवड्यात तुमच्या डायरी किंवा नोटबुकमध्ये एक नाणे ठेवा.

कुंभ

या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक बदल किंवा नवीन संधी येऊ शकते. creative लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. काही लोक तुमच्या विचारांशी सहमत नसतील पण तुमचा uniqueness  तुम्हाला पुढे नेईल. जुने मित्र पुन्हा संपर्क करू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल clarity मिळेल.

उपाय: या आठवड्यात निळ्या रंगाची छोटी वस्तू जवळ ठेवा.

मीन

या आठवड्यात तुमचे मन spiritualआणि  emotionalदोन्ही पातळीवर emotional राहील. स्वप्नांमधून किंवा अचानक आलेल्या विचारांमधून काही संकेत मिळू शकतात. एखाद्या जुन्या आठवणीमुळे मन भावूक होईल. आर्थिक बाबतीत थोडे planning करणे गरजेचे आहे. स्वत:च्या energy ची काळजी घ्या.

उपाय: या आठवड्यात रात्री झोपण्यापूर्वी थोडासा अत्तराचा सुगंध घ्या.

या आठवड्याचा सर्वांसाठी उपाय

या आठवड्यात एकदा तरी तुमच्या फोनमधील जुने unnecessary फोटो किंवा chats delete करा. जुनी energy release केल्यावर नवीन opportunities आणि clarity आयुष्यात लवकर येते.

Advertisement
Tags :

.