अक्षरयात्रा राशीभविष्य
दि. 1-3-2026 ते 7-3-2026 पर्यंत
मेष
या आठवड्यात तुमच्यासमोर अचानक सत्य उघड होताना दिसते. जे काही डोळ्यांसमोर होते ते आतून बदल घडवेल. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, पण त्यामुळेच नवीन दिशा मिळेल. जुने पॅटर्न तुटताना दिसतात. थोडी अस्वस्थता येईल, पण तीच वाढीसाठी गरजेची आहे. धैर्य ठेवल्यास शेवटी तुम्हीच पुढे असाल. होळीपूर्वी मन हलके होईल.
मंगळवारी गरम पाण्याने आंघोळ करा.
वृषभ
या आठवड्यात समृद्धी आणि सुरक्षिततेची भावना वाढताना दिसते. तुम्ही जे जोपासत आहात त्याला फळ येण्याची वेळ जवळ आहे. नातेसंबंधात मायेची ऊब जाणवेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. स्वत:ची किंमत ओळखण्याचा हा काळ आहे. होळीच्या आसपास आनंदाची बातमी मिळू शकते. स्वत:ची काळजी घ्या.
शुक्रवारी सुगंधी तेल लावा.
मिथुन
तुमच्या हातात सर्व साधने आहेत, फक्त लक्ष केंद्रित करायचे आहे. शब्द, विचार आणि कृती यांचा योग्य वापर केल्यास मोठा बदल घडेल. या आठवड्यात तुम्ही प्रभाव टाकाल. संभाषणातून संधी मिळतील. गोंधळ कमी होईल. होळीच्या आधी निर्णय स्पष्ट होतील. आत्मविश्वास वाढेल.
बुधवारी वही-पेन स्वच्छ ठेवा.
कर्क
या आठवड्यात आतल्या भावनांचा प्रवास जास्त असेल. काही गोष्टी स्पष्ट दिसणार नाहीत, पण मनाला सगळे कळत असेल. भूतकाळाशी संबंधित विचार येऊ शकतात. घाईने निष्कर्ष काढू नका. शांततेत उत्तर सापडेल. होळीच्या ऊर्जेमुळे मन हलके होईल. स्वत:वर विश्वास ठेवा.
सोमवारी चंद्राकडे पाहून खोल श्वास घ्या.
सिंह
आतून स्थिर आणि संयमी शक्ती जागी होताना दिसते. बाहेरून कठीण वाटणारी परिस्थिती तुम्ही सहज हाताळू शकता. रागावर नियंत्रण ठेवल्यास विजय निश्चित आहे. नात्यात समज वाढेल. या आठवड्यात तुमचा आत्मसंयम लोकांना प्रभावित करेल. होळीच्या आधी आत्मविश्वास वाढेल.
रविवारी हळद लावलेले पाणी हातावर शिंपडा.
कन्या
एक पाऊल मागे घेऊन विचार करण्याची गरज आहे. गोंधळापासून दूर राहिल्यास योग्य उत्तर मिळेल. आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. सर्व उत्तरे बाहेर नसतात. कामात थोडी शांतता येईल. होळीच्या आधी मानसिक स्पष्टता मिळेल. एकांत उपयुक्त ठरेल.
बुधवारी 10 मिनिटे शांत बसणे.
तुळ
तुमच्या कर्मांचा परिणाम या आठवड्यात स्पष्ट दिसेल. जे योग्य आहे ते तुमच्याकडे येईल. निर्णय नि:ष्पक्ष ठेवा. कायदेशीर किंवा कागदी कामात फायदा होऊ शकतो. नात्यांत समतोल साधला जाईल. होळीच्या आसपास गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. सत्याचा विजय होईल.
शुक्रवारी आरसा स्वच्छ करा.
वृश्चिक
एक मोठा बदल जवळ येताना दिसतो. जे संपायला हवे ते संपेल. सुऊवातीला अस्वस्थता येईल, पण त्यातूनच नवीन सुऊवात होईल. भावनिक ओझे हलके होईल. जुने बंध तुटतील. होळीच्या आधी मन मोकळे होईल. परिवर्तन स्वीकारा.
मंगळवारी अनावश्यक वस्तू काढून टाका.
धनु
परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसते. अचानक संधी मिळू शकते. जे अडकले होते ते पुढे सरकेल. नशिबाची साथ मिळेल, पण कृती गरजेची आहे. उत्साह वाढेल. होळीच्या आसपास आनंददायी वळण येईल. योग्य वेळ ओळखा.
गुरुवारी हसून दिवसाची सुरुवात करा.
मकर
तुमची भूमिका मजबूत होताना दिसते. जबाबदारी आणि नियंत्रण तुमच्या हातात येईल. शिस्त आणि नियम पाळल्यास मोठे यश मिळेल. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. या आठवड्यात स्थैर्य जाणवेल. होळीपूर्वी अधिकार वाढतील. ठाम रहा.
शनिवारी टेबल/कामाची जागा नीट करा.
कुंभ
आशेचा नवा किरण दिसतो. जे हरवले होते ते परत सापडेल. मनाला दिशा मिळेल. उपचार आणि शांततेचा काळ आहे. मित्रांकडून मदत मिळेल. होळीच्या आसपास सकारात्मक बदल जाणवेल. विश्वास पुन्हा जागा होईल.
शनिवारी आकाशाकडे पाहून इच्छा मनात ठेवा.
मीन
आतले ज्ञान आणि शांतता या आठवड्यात मार्गदर्शन करेल. सर्व गोष्टी लगेच उघड होणार नाहीत. गुप्त संकेत मिळतील. भावनिक समज वाढेल. अंतर्ज्ञानावर चाललात तर चूक होणार नाही. होळीच्या आधी आत्मिक समाधान मिळेल.
गुरुवारी सकाळी शांत संगीत ऐका.
सर्व राशींसाठी समान होळी उपाय :
होळीच्या दिवशी अग्नीत तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार आणि जुने ओझे मानसिकरित्या अर्पण करा आणि नवीन सुरुवातीसाठी स्वत:ला मोकळे करा.