For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:02 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष

या आठवड्यात कामातील अडथळे हळूहळू दूर होतील. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. आर्थिक बाबतीत घाईचे निर्णय टाळा. कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य मिळेल. मन शांत ठेवून पुढे गेल्यास चांगले परिणाम मिळतील.

Advertisement

या आठवड्यात एक दिवस कोणतेही काम स्ल्त्tग्tasक्ग्हु न करता एकावेळी फक्त एकच काम पूर्ण करा.

वृषभ

कामात स्थिरता राहील आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक नियोजनासाठी चांगला काळ आहे. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होईल. नवीन संधी मिळाल्यास त्याचा योग्य विचार करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

घरातील एखादी वस्तू जी तुम्हाला आनंद देते, ती आठवडाभर अशा जागी ठेवा जिथे सकाळी उठल्यावर ती सर्वप्रथम दिसेल.

मिथुन

संवादातून अनेक प्रŽ सुटतील. व्यवसायात नवीन संपर्क उपयोगी ठरतील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, पण परिणाम समाधानकारक राहतील. प्रवासाची शक्मयता आहे. भावनेपेक्षा विचार करून निर्णय घ्या.

या आठवड्यात एक दिवस 24 तास तक्रार न करण्याचा संकल्प करा.

कर्क

कुटुंब आणि घराशी संबंधित विषयांना प्राधान्य मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल. जुने गैरसमज दूर करण्यासाठी योग्य वेळ आहे. मनातील नकारात्मक विचार सोडून नवीन सुऊवात करा.

आपल्या फोनमधील एखादा जुना फोटो निवडा, ज्याच्याशी सुंदर आठवण जोडलेली आहे, आणि तो पुन्हा एकदा जतन करून ठेवा.

सिंह

कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आत्मविश्वास कायम ठेवा, पण हट्टीपणा टाळा.

आठवड्यातील एका दिवशी स्वत:साठी 30 मिनिटे अशी ठेवा, ज्यात कोणाचेही काम किंवा अपेक्षा पूर्ण करायची नाही.

कन्या

नियोजनबद्ध काम केल्यास चांगले यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन जबाबदारी येऊ शकते. आर्थिक बाबतीत काटकसर फायदेशीर ठरेल. आरोग्यापेक्षा मनावरील ताण कमी करण्याकडे लक्ष द्या.

घरातील एखादा छोटासा ड्रॉवर किंवा कप्पा पूर्णपणे रिकामा करून पुन्हा नीट लावा.

तूळ

भागीदारी आणि व्यावसायिक संबंधांसाठी आठवडा चांगला आहे. महत्त्वाची चर्चा तुमच्या बाजूने सकारात्मक होऊ शकते. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होईल. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. नात्यांमध्ये स्पष्टपणे संवाद साधा.

या आठवड्यात एखादा निर्णय दुसऱ्याच्या मतावर न घेता, आधी स्वत:ला काय हवे आहे ते लिहून काढा.

वृश्चिक

आत्मविश्वास वाढेल. कामातील अडचणींवर योग्य तोडगा सापडेल. नवीन निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक बाबतीत अनावश्यक जोखीम घेऊ नका. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील.

एका कागदावर ‘जे आता माझ्या आयुष्यात आवश्यक नाही’ असे लिहून त्याखाली तीन गोष्टी लिहा आणि तो कागद फाडून टाका.

धनु

नवीन संधी आणि नवीन संपर्क या आठवड्यात मिळू शकतात. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्मयता आहे. आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसतील. जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्या.

या आठवड्यात नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळ्या रस्त्याने एखाद्या परिचित ठिकाणी जाऊन पहा.

मकर

कामाचा वेग वाढेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबातील एखादा महत्त्वाचा निर्णय चर्चेत येईल. संयम आणि सातत्य तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा घरात अशी एक जागा निवडा जी आठवडाभर पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामी ठेवायची.

कुंभ

नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसाय किंवा कामात बदल करण्याचा विचार पुढे जाऊ शकतो. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.

एखाद्या व्यक्तीला अचानक फोन करून फक्त ‘तुझी आठवण आली म्हणून फोन केला’ एवढेच सांगा.

मीन

मनातील अनेक चिंता कमी होतील. कामात नवीन दिशा मिळू शकते. आर्थिक लाभाची शक्मयता असून खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तीशी महत्त्वाची चर्चा होईल. जुने प्रŽ मागे सोडून नवीन सुऊवातीवर लक्ष द्या.

रात्री झोपण्यापूर्वी उद्याचे फक्त एक महत्त्वाचे काम लिहा आणि बाकी सर्व विचार उद्यावर सोडा.

सर्व राशिंसाठी सामान्य उपाय

नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा उघडा, काही क्षण शांत उभे राहा आणि मनात म्हणा, ‘जुना महिना कृतज्ञतेने सोडते/सोडतो आणि नवीन महिन्याचे स्वागत खुल्या मनाने करते/करतो.’

Advertisement
Tags :

.