अक्षरधाम : ऑपरेशन वज्र शक्ति’ लवकरच
अभिनेता अक्षय खन्ना स्वत:चा चित्रपट ‘अक्षरधाम : ऑपरेशन वज्र शक्ति’सोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय यापूर्वी ‘छावा’ या चित्रपटात दिसून आला होता. अक्षयच्या ‘अक्षरधाम : ऑपरेशन वज्र शक्ति’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. केन घोषकडून दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय खन्ना एनएसजी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 2002 च्या गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित आहे. हा दहशतवादी हल्ला हाणून पाडण्याची कामगिरी एनएसजीने केली होती. एनएसजीच्या याच मोहिमेवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत गौतम रोडे, विवेक दहिया, अक्षय ओबेरॉय आणि अभिलाष चौधरी हे कलाकार आहेत. हा चित्रपट 4 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 24 सप्टेंबर 2002 रोजी अनेक दहशतवाद्यांनी गांधीनगर येथील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरावर हल्ला केला होता, या हल्ल्यात अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. सत्य कहाणीवर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.