For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षरयात्रा राशिभविष्य

06:10 AM Aug 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
अक्षरयात्रा राशिभविष्य
Advertisement

दि. 10-8-2025 ते 16-8-2025 पर्यंत

Advertisement

मेष

या आठवड्यात टारोट कार्ड 'The Chariot' सूचित करतो की, आपण गतिमान निर्णय घेणार आहात. नवीन संधी मिळतील आणि उत्साहाने पुढे जाल. पण आत्मसंयम आणि ध्येयस्थिरता अत्यावश्यक आहे. प्रेमसंबंधात स्थैर्य लाभेल. नोकरीत बदलाची शक्मयता आहे. घरात जुन्या गोष्टींचे निराकरण होईल. आरोग्य चांगले राहील. परंतु थकवा जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात शहाणपण राखा. मानसिक संतुलनासाठी ध्यान उपयुक्त ठरेल.

Advertisement

मंगळवारी लाल पुष्प अर्पण करा.

वृषभ

या आठवड्यात टारोट 'The Empress' सूचित करते की, सौंदर्य, समृद्धी आणि कुटुंब या बाबतीत समाधान लाभेल. घरात नवीन काही खरेदी होण्याची शक्मयता. नोकरीत स्त्राr सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेमसंबंध गोड राहतील. आरोग्य उत्तम राहील. आईशी संबंधित विषयांमध्ये प्रगती होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. नवी कल्पना ऊजेल.

शुक्रवारी साजूक तुपाचा दीप लावा.

मिथुन 

'The Lovers' सूचित करतो की, निर्णय प्रक्रियेत द्विधा भावना असतील. प्रेमसंबंधात नवा मोड येईल. जुने वाद मिटतील. नोकरीत पर्याय उपलब्ध होतील. आर्थिक बाबतीत संतुलन आवश्यक. प्रवासाचे योग आहेत. कौटुंबिक संवाद सुधारेल. जुने मित्र भेटतील. स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

बुधवारच्या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करा व हरित रंग परिधान करा.

कर्क

'The Moon'  हे टारोट कार्ड मानसिक द्विधा दर्शवते. स्वप्नांची पूर्तता करायची असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. गोंधळ टाळा. प्रेमसंबंधात स्पष्टतेची गरज भासेल. आरोग्याच्या दृष्टीने निद्रा व मानसिक शांतता महत्त्वाची. नोकरीत धोरणात्मक विचार करा. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आर्थिक निर्णय उशिरा घ्या. जुने निर्णय पुनरावलोकन करा.

सोमवारी चंद्र यंत्रावर दूध अर्पण करा.

सिंह 

या आठवड्यात 'Strength' टारोट कार्ड आपल्याला धैर्य व संयम दाखवायला सांगते. तुम्ही कठीण परिस्थितीतही विजय मिळवाल. नोकरीत जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत यश. कुटुंबात तुम्हाला केंद्रस्थानी स्थान मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. आरोग्य सुदृढ राहील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. निर्णयावर ठाम रहा.

रविवारी सूर्याला जल अर्पण करा व गूळ-गहू दान करा.

कन्या

या आठवड्यात ’'The Hermit' कार्ड तुम्हाला अंतर्मुखतेची आवश्यकता दर्शवते. विचारपूर्वक निर्णय घ्या. जुने अनुभव उपयोगी ठरतील. नोकरीत तात्पुरते विलंब संभवतात. आर्थिक स्थिती नियंत्रित राहील. प्रेमसंबंधात एकटेपणा जाणवू शकतो. वैचारिक स्पष्टता हवी. अभ्यासासाठी योग्य वेळ. आरोग्य सावरताना आंतरिक शांती महत्त्वाची.

बुधवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.

तुळ

'Justice' टारोट कार्ड सांगते की, तुम्हाला योग्य ते मिळेल. कर्तृत्वाचा योग्य मोबदला मिळेल. नोकरीत यशस्वी निर्णय होतील. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आवश्यक. न्यायसंबंधी बाबतीत सकारात्मक संकेत. प्रेमात स्पष्टता व संवाद गरजेचा. कौटुंबिक व्यवहार संतुलित ठेवा. आरोग्य सुधारेल. आत्मनिरीक्षण करा.

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा व गुलाब पाणी अर्पण करा.

वृश्चिक

'Justice' टारोट कार्ड सूचित करते की, जीवनात मोठा बदल होऊ शकतो. जुने सोडल्याशिवाय नवीन सुरू होत नाही. नोकरीत भूमिका बदलू शकते. आर्थिक व्यवहारात पूर्वनियोजन आवश्यक. कौटुंबिक गुंतागुंत दूर होईल. प्रेमसंबंधात नवे पर्व सुरू होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. मानसिकताही बदलावी लागेल.

मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा.

धनु

'Wheel of Fortune' हे कार्ड नशिबाच्या चक्राला दर्शवते. परिस्थिती जलद बदलेल. नोकरीत प्रगतीच्या संधी. आर्थिक लाभ संभवतो. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचे योग निर्माण होतील. प्रेमसंबंध गोड राहतील. आरोग्य चांगले राहील. भावनिक स्थैर्य लाभेल. संधीचा योग्य वापर करा.

गुरुवारी पिवळे फळ दान करा.

मकर

'The Devil' कार्ड सूचित करते की, तुमच्यावर लोभ किंवा कंट्रोलचा प्रभाव आहे. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. नोकरीत तणाव संभवतो. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संबंधात स्वतंत्रतेची भावना आवश्यक. आरोग्यावर लक्ष द्या. व्यसनांपासून दूर रहा. आत्मशुद्धी करा. ध्यान महत्त्वाचे ठरेल.

शनिवारी काळे उडदाचे दान करा.

कुंभ 

'Judgment' टारोट कार्ड सूचित करते की, तुम्ही जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहात. जुनी कामे प्रभावी ठरतील. आत्मनिरीक्षण करा. नोकरीत नवीन संधी मिळतील. कौटुंबिक मतभेद मिटतील. आरोग्यात सुधारणा. आर्थिक निर्णय योग्य होतील. प्रेमसंबंध सशक्त होतील. आपल्यावर विश्वास ठेवा.

शनिवारी काळे वस्त्र परिधान करा आणि नदीत तेल वाहवा.

मीन

'High Priestess' टारोट कार्ड सूचित करते की, अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. गोष्टी स्पष्ट नसतील तरी आपल्या अंतरात्म्यावर विश्वास ठेवा. नोकरीत शांततेने काम करा. आर्थिक गुंतवणुकीत संयम ठेवा. कौटुंबिक रहस्य उघड होऊ शकते. प्रेमसंबंधात समजूतदारपणा आवश्यक. आरोग्य मध्यम. अध्यात्माकडे ओढ वाढेल.

गुरुवारी ओंकार जप करा आणि तुळशीला जल अर्पण करा.

कित्येक वेळेला आपली काहीही चूक नसताना एखादी व्यक्ती खूप त्रास देते. हा त्रास शारीरिक-मानसिक दोन्ही प्रकारचा असू शकतो. अशा वेळी एक गोमती चक्र (ओरिगिनल) घ्यावे. त्याच्या सपाट बाजूवर त्या व्यक्तीचे नाव लाल मार्करने लिहावे. मग ते गोमती चक्र सपाट बाजूखाली करून त्यावर वजनदार वस्तू ठेवावी. त्रास देणाऱ्याचे तोंड बंद होते.

Advertisement
Tags :

.