अक्षरयात्रा राशिभविष्य
23/02/2025
मेष
आपण बरे की आपले काम बरे या प्रकारचा अॅटिट्यूड ठेवा. कार्यक्षेत्रात तुमच्या कामात सतत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. एखाद्या विषयात गुंतून पडण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.
कावळ्यांना फरसाण घाला.
वृषभ
ज्या गोष्टी समजणार नाहीत, त्यात शुभचिंतकांचा सल्ला घ्या किंवा असे निर्णय टाळणे योग्य राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होतील, त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. या काळात कामानिमित्त अनावश्यक धावपळ होऊ शकते. या आठवड्यात प्रकृती नाजूक राहील. त्यामुळे हलगर्जीपणा न करता वैद्यकीय सल्ला घ्या.
खिशात उंबराचे पान ठेवा.
मिथुन
हंगामी किंवा काही जुने आजार डोके वर काढतील, त्यामुळे त्रास होईल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही. व्यापाऱ्यांनी नव्या योजनात गुंतवणूक करताना फार सावध राहावे. अडचणीच्या काळात लव्ह पार्टनर आधार ठरेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक काही अफवा पसरवू शकतात. सावध राहा.
हळदीचा टिळा लावावा.
कर्क
हा आठवडा सुख आणि समृद्धीचा आहे. आठवड्याच्या सुऊवातीलाच तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित शुभवार्ता मिळणे सुरू होईल. जर तुम्ही दीर्घकाळापासून बदलीची वाट पाहत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छापूर्ती होईल. आठवड्याच्या सुऊवातीला सुखसुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी झाल्याने घरी आनंदाचे वातावरण राहील.
तळलेले पदार्थ दान द्या.
सिंह
तब्येतीच्या बाबतीत बेपर्वा राहू नका. लहान आजार मोठा होऊ शकतो. व्यापारात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंदात वाढ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना तुमचे खर्चही वाढतील पण हा पैसा शुभकार्यावर खर्च होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात शुभचिंतकाच्या मदतीने एखादे मोठे कार्य पूर्ण कराल. जोडीदाराच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे कारण ठरेल.
मंदिरात बुंदी वाटा.
कन्या
या आठवड्याच्या पहिल्या टप्प्यात धन आणि सुख प्राप्ती होईल. पण तुमचा वेळ आणि पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होईल. आठवड्याच्या सुऊवातीला तुम्हाला प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या कालावधीत हंगामी आजारांच्या कचाट्यात सापडाल. अनावश्यक धावपळ आणि खर्चामुळे तुमचे मन थोडे उदास होईल. शुक्रवारी आनंदाची बातमी कळेल.
हिरवी काचेची गोटी जवळ ठेवा.
तूळ
तुम्ही जे करता त्याचे व्रेडिट दुसऱ्याला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक कामात अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील काही मुद्द्यांवरून नातेवाईकांशी मतभेद होतील. पण चर्चेच्या वेळी तुमच्याकडून वाईट भाषा वापरली जाणार नाही आणि वाईट व्यवहार होणार नाही, याकडे लक्ष द्या अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
5 लवंगा जवळ ठेवा.
वृश्चिक
आठवड्याच्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात जास्त दिलासा मिळेल. या काळात व्यापारांच्या संदर्भाने केलेला प्रवास इच्छित लाभ मिळवून देईल. एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन कार्याची योजना बनवाल. परदेशात व्यापार करू इच्छिणाऱ्या लोकांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रेमसंबंधात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
नारळाचे झाड लावा.
धनु
तब्येत ठीक असेल. हा आठवडा संमिश्र्र जाईल. आठवड्याच्या सुऊवातीला कामाचा ताण राहील. तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यात फार धावपळ करूनही मनासारखे यश मिळणार नाही. आठवड्याच्या मध्यावर कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत एखाद्या विषयावरून मतभेद होऊ शकतात.
हळदीच्या पाण्याने स्नान करा.
मकर
आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या मदतीने एखाद्या लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. सत्ता किंवा सरकारशी संबंधित प्रलंबित कामांना गती येईल. या काळात धार्मिक आणि सामाजिक कामात तुमचे योगदान वाढेल. कडूगोड तक्रारी असतानाही प्रेमसंबंध चांगले राहतील. तसेच कठीण काळात तुमचा जोडीदार तुमची शक्ती बनेल.
वेलची जवळ ठेवा.
कुंभ
आठवड्याच्या अखेरीस जोडीदारासोबत दीर्घ प्रवासावर जाल. आठवड्याच्या सुऊवातीला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. पण तुमचा आळस आणि बेजबाबदारपणा यामुळे तुम्ही या संधी गमावण्याचीही शक्मयता आहे. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य कमी मिळेल. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील.
रंगीत मिठाई दान द्या.
मीन
व्यापाराशी संबंधित लोकांना ही वेळ शुभ सिद्ध होईल. व्यापारात तुम्हाला मनासारखा लाभ मिळेल. या काळात समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. घरी आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन मिळेल. या कालावधीत रोजगाराच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरी शुभकार्य संपन्न होईल.
मांसाहार करणे टाळा.
हा उपाय विद्यार्थ्यांकरता आहे. शिक्षणात यश मिळवण्यासाठी मेहनत करणे भागच आहे. त्याबरोबर शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सूर्यास्ताच्या अर्ध्या तासापूर्वी वडाच्या पानावर पाच वेगवेगळे मिष्टान्न आणि दोन वेलची ठेवून हे पिंपळाच्या झाडाखाली श्र्रद्धापूर्वक ठेवा आणि शैक्षणिक प्रगतीची प्रार्थना करा. घरी येताना मागे वळून पाहू नका. हा उपाय सतत तीन गुरुवारी करावा.