राशिभविष्य
दि. 3-8-2025 ते 9-8-2025 पर्यंत
मेष
या आठवड्यात The Magician" कार्ड आले आहे, जे तुम्हाला आत्मविश्वास आणि कल्पकता देते. कामात नवीन सुऊवात होईल. योजना यशस्वी ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमात आकर्षण वाढेल. स्वत:च्या निर्णयांवर विश्वास ठेवा. आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या लोकांशी भेटी होणार. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती. सर्जनशीलतेचा वापर करा.
मंगळवारी लाल वस्त्र दान करा.
वृषभ
"The Empress" कार्ड तुम्हाला सर्जनशीलता, समृद्धी आणि कौटुंबिक सुख दर्शवते. घरगुती आयुष्यात सौख्य मिळेल. महिलांना लाभदायक वेळ. आर्थिक उत्पन्नात वाढ. प्रेमात नवा टप्पा. एखाद्या स्त्राrकडून मदत मिळेल. घरात आनंददायक वातावरण. नवीन कल्पना फळाला येतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्थैर्य मिळेल.
शुक्रवारी पांढऱ्या फुलांनी देवीची पूजा करा.
मिथुन
"Two of Swords" कार्ड निर्णयात अडचण दाखवते. मन असमंजस राहील. संबंधांमध्ये स्पष्टपणा आवश्यक. कामात विलंब. जुने वाद उफाळू शकतात. प्रवास टाळा. आर्थिक विषयात संयम ठेवा. आरोग्यावर लक्ष द्या. घरातील कलहामध्ये थोडे तटस्थ राहणे चांगले. अंत:करणाचा आवाज ऐका, फायदा होईल.
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा.
कर्क
"The Chariot" कार्ड विजय आणि पुढे जाण्याची ऊर्जा दर्शवते. कामात अडथळे पार कराल. धैर्य वाढेल. पण या बरोबर हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, काही लोक कामात अकारण अडथळे आणू शकतात. वाहनसुख प्राप्त होईल. प्रेमात दृढता येईल. जुने निर्णय फायदेशीर ठरतील. प्रवासात यश. आरोग्य उत्तम. आत्मविश्वासाने काम करा. यश निश्चित आहे.
सोमवारी शिवपिंडीवर दूध अर्पण करा.
सिंह
"The Sun" कार्ड सर्वोत्तम फळांचे प्रतीक आहे. या आठवड्यात सर्वत्र यश, प्रसिद्धी आणि समाधान आहे. आर्थिक लाभ संभवतो. प्रेमसंबंध अधिक गोड होतील. घरात हसणे-खिदळणे होईल. नवीन संधी प्राप्त होतील पण आळसामुळे ती गमावू नका. आरोग्य उत्तम. मुलांशी संबंधित शुभ घटना. आत्मविश्वास प्रचंड. समाजात सन्मान.
रविवारी सूर्यनमस्कार करा व तांबं अर्पण करा.
कन्या
"Four of Pentacles" कार्ड धरण, साठवण आणि नियंत्रण दर्शवते. पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. जुनी गुंतवणूक फायद्याची ठरेल. प्रेमात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य सामान्य. मनावर थोडा ताण राहील. जुने मुद्दे सतावतील. विश्वास टाका पण अंधविश्वास नको. संयम आवश्यक. कामाच्या ठिकाणी क्षुल्लक गोष्टींवरून वाद होईल.
बुधवारी हरिद्रा-कुंकू अर्पण करा.
तुला
"Justice" कार्ड कर्म प्रधान रहा, असा संदेश देते. कायदेशीर कामे पूर्ण होण्याची शक्मयता. न्याय लाभेल. संबंधांमध्ये समतोल राखा. कामात प्रामाणिकपणा ठेवा. आर्थिक विषयात पारदर्शकता आवश्यक. जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा. तणाव कमी होईल. आत्मपरीक्षण करा. उगाच टेंशन घेऊन काही उपयोग नाही, हे लक्षात येईल.
शुक्रवारी गुलाब फुल देवीला अर्पण करा.
वृश्चिक
"Death" कार्ड जुना अध्याय संपवण्याची सूचना देते. जुने संबंध किंवा कल्पना संपुष्टात येतील पण हे तुमच्या भल्याकरता असेल. नवीन सुऊवात होईल. आरोग्य सुधारेल. मानसिक स्थैर्य मिळेल. प्रेमसंबंधांत नवा टप्पा. जीवनात सकारात्मक बदल होतील. धाडसाने पुढे जा. आळसाचा त्याग केल्यास फायदा नक्की आहे. संधीच्या शोधात रहा.
मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा.
धनु
"The Fool" कार्ड नवीन सुऊवातीचा इशारा देते. पण त्याच बरोबर गाफिल राहून चालणार नाही, याचा इशाराही देते. अनपेक्षित संधी येतील. नवीन प्रवासाची शक्यता. मन मोकळे ठेवा. जोखीम घेण्याची वेळ. प्रेमात चुकू नका. पैसे गुंतवताना काळजी घ्या. घरातील वातावरण हलकेफुलके. आरोग्य सामान्य. सकारात्मकतेचा स्वीकार करा.
गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा.
मकर
"King of Pentacles" कार्ड धन, स्थैर्य आणि बुद्धिमत्ता दर्शवते. आर्थिक बाबतीत यश. वरिष्ठांशी संबंध लाभदायक. प्रेमात स्थिरता. कुटुंबात विश्वास. कामात वाढ. जुनी मालमत्ता उपयोगी. समाजात प्रतिष्ठा. नवीन करार फायदेशीर. काही ठिकाणी गोंधळ होण्याची शक्मयता आहे. शांतपणे निर्णय घ्या. नाती जपावी लागतील.
शनिवारी काळे वस्त्र आणि तेलाचे दान करा.
कुंभ
"The Star" कार्ड आशा, भरवसा आणि नव्या सुऊवातीचे प्रतीक आहे. काळ अनुकूल. इच्छा पूर्ण होण्याची शक्मयता. प्रेमात सकारात्मक बदल. कामात नव्या दिशा. मानसिक समाधान. शरीर-मन ताजे वाटेल. प्रवास यशस्वी. आध्यात्मिक उन्नती. जवळच्या एखाद्या व्यक्तीकरता आर्थिक आणि भावनिक मदत करावी लागू शकते.
शनिवारी काळ्या तिळाचे दान करा.
मीन
"The High Priestess" कार्ड अंतर्ज्ञान, गुपिते आणि ज्ञान दर्शवते. निर्णय घेताना अंतर्मन ऐका. आध्यात्मिक प्रगती. कामात सुज्ञपणा आवश्यक. लोक कामाच्या बाबतीत घाबरवण्याचा प्रयत्न करतील. पण हे सर्व खोटे आहे, हे ध्यानी असू द्या. अति विश्वास टाळा. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. प्रेमात संयम ठेवा. आरोग्यावर लक्ष द्या. नवे शिक्षण किंवा कोर्स सुरू करू शकता.
गुरुवारी पुस्तके आणि पिवळ्या वस्त्रांचे दान करा.
स्वत:चे घर होण्याकरता उपाय : आपले स्वत:चे घर व्हावे, असे प्रत्येकाला वाटते पण बऱ्याच वेळा अडचणी संपता संपत नाहीत. या करता राहत्या घराच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर टुमदार घराचे चित्र लावावे. नवग्रहाच्या मंदिरात स्वत:च्या हाताने शाडूचे घर बनवून अर्पण करावे.