अक्षरयात्रा राशिभविष्य
दि. 13-07-2025 ते 19-07-2025 पर्यंत
मेष
या आठवड्यात टॅरोवर ‘द फूल’ कार्ड दर्शवते की, नव्या प्रारंभाला खुले आहात. नवे मित्र, सल्ला देणारे, नवीन जागा पहाल. काही अडचणी येणार पण त्यात संधी दडलेली आहे. आर्थिक बाबतीत थोडी जोखीम घेतल्यास फायदा होईल. प्रेमात उत्साह, पण संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्य उत्तम, पण थकवा जाणवू शकतो. मित्र-परिवाराचे सहकार्य आवश्यक राहील.
रविवारी तांब्याचा लोटा दान करा.
वृषभ
टॅरोवर ‘इम्प्रेस’ कार्ड कुटुंब, व्यवसायात समृद्धीची घोषणा करते. घरात प्रेम वाढेल. आर्थिक निधी विस्तारेल. सर्जनशील प्रकल्प यशस्वी होतील. आरोग्य चांगले, परंतु पोषक आहार आवश्यक. लग्न/नाते अधिक घट्ट होईल. साहसाची छाया आहे, पण तयारी गरजेची. मन शांत राहील, ध्यान उपयुक्त ठरेल. जुन्या मित्राकडून पैसे येतील.
गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करा.
मिथुन
टॅरोवर ‘द मॅजिशियन’ दाखवतो की, आत्मशक्ती प्रबल आहे. संवादशैली सुधारेल. व्यावसायिक निर्णय यशस्वी होतील. आर्थिक क्षेत्रात नवीन ओळखी मार्गदर्शन करतील. प्रेमात आकर्षण वाढेल. आरोग्यात तरोताजा, धोका कमी. शिक्षणात प्रेरणा मिळेल. सर्जनशील उपक्रम फुलतील. सामाजिक मान वाढेल. घरच्या वातावरणाला मात्र सांभाळा.
बुधवारी मूग दान करा.
कर्क
‘द च्यारिओट’ कार्ड गतिशीलता आणि विजय सूचित करते. कुटुंबात असलेले वाद-विवाद/विरोध यांचे निवारण होईल. कामात वेग आणि यश मिळेल. आर्थिक निर्णय दृढ होतील. प्रेमात सामंजस्य वाढेल. आरोग्य ठीक असेल पण टेंशनमुळे त्रास असेल. कामाचा भार कमी ठेवा. प्रवास फायदेशीर. आत्मविश्वास उत्तम, पण संयम आवश्यक.
सोमवारी दूध अर्पण करून चंद्र दर्शन घ्या.
सिंह
‘द इम्पेरर’ कार्ड नेतृत्व दर्शवते. कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. प्रतिष्ठा प्रबल होईल. पण तितकीच मेहनत जास्तीची असेल. निर्णय क्षमतेत वाढ. आरोग्य उत्तम, व्यायाम उपयुक्त ठरेल. आर्थिक व्यवहार समतोल राहतील. प्रेमात सुरक्षा व प्रेम वाढेल. सामाजिक सन्मान मिळेल. कुणावरही अरेरावी करू नका, पुढे जाऊन नुकसान होईल.
रविवारी लाल फळ दान करा.
कन्या
‘द हायरोफंट’ दर्शवतो की पारंपरिक मार्ग, नियम, शिक्षक महत्त्वपूर्ण असेल. जुन्या व्यक्तींना योग्य तो मान द्या, फायदा होईल. अभ्यास/धार्मिक उपक्रम यशस्वी होतील. आर्थिक योजना चांगल्या राहतील. आरोग्यात संतुलन आवश्यक. घरगुती संबंधात समज वाढेल. प्रेमात समजूतदारपणा येईल. सामाजिक कार्यात सहभागाचा मार्ग मिळेल.
गुरुवारी पंचामृत सेवन करा.
तूळ
‘द लव्हर्स’ कार्ड प्रेम, संबंध आणि निर्णय क्षेत्रात अनुकूलता दाखवतो. नाती अधिक घट्ट होतील. आर्थिक निर्णय यशस्वी होतील. सुंदर आनंददायी क्षण येतील. आरोग्यावर ताण कमी असेल. सौंदर्य आणि कलात्मक उपक्रमांना प्रेरणा. प्रवास काहीतरी नवा अनुभव देईल. सामाजिक संवादात रस वाढेल. सोबत काम करणाऱ्यांशी वाद होऊ शकतो.
शुक्रवारी पांढरे दूध दान करा.
वृश्चिक
‘द डेथ’ कार्ड नवे परिवर्तन दर्शवते. जुने सोडून नवनवीन स्वीकारावे लागेल. व्यवसाय/कर्तव्य क्षेत्रात बदल असतील. आर्थिक पुनर्रचना संभवते. प्रेमात गतिशीलता, नात्याचे पुनर्निर्माण. आरोग्य सुदृढ, पण चिंता कमी ठेवावी लागेल. मनोबल घटणार नाही. उद्दिष्टात परिवर्तन आवश्यक असेल. परिवर्तनाला किंमत लागते, ती मात्र द्यावी लागेल.
शनिवारी काळे तिळ वाहत्या पाण्यात सोडा.
धनु
‘द स्टार’ कार्ड आशा, प्रेरणा, आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देते. शिक्षणात आणि प्रवासात यश. आर्थिक लाभ आणि समृद्धी. आरोग्य चांगले, संतुलित दिनचर्या उपयुक्त ठरेल. प्रेमात विश्वास आणि आस्था वाढेल. आत्मविश्वास प्रबळ असेल. जितके होईल तितके आपल्या सोबत काम करणाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा. कुणी अफवा पसरवणार नाही, याची काळजी घ्या.
गुरुवारी बुंदी दान करा.
मकर
‘द हँग्ड्ड मॅन’ दाखवतो की, पुढे जाण्याकरता चार पावले मागे जावे लागते. तात्पुरती शांतता मानसिक शांती करता आवश्यक आहे. संयमाने प्रयत्न केल्यास फायदा होईल. आर्थिक निर्णयात काळजी, पण फलदायी. आरोग्य चांगले, विश्र्रांती आवश्यक. प्रेमात संयम व आपुलकी, कुटुंबात शांतता येईल. कारकिर्दीत नाव मिळू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता असेल.
शनिवारी काळे उडीद दान करा.
कुंभ
‘द एस ऑफ स्वोर्ड्स’ कार्ड स्पष्टता, नव्या कल्पना व बुद्धिमत्ता सूचित करते. निर्णय-क्षमतेत वृद्धी. आर्थिक बाबतीत नवे निर्णय घ्यावे लागतील. व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची गफलत करू नये. जी व्यक्ती सोडून गेली ती आपली नव्हतीच हे ध्यानी घ्या. आरोग्य सामान्य, परंतु मन:शांतता आवश्यक. प्रेमात संवाद महत्त्वाचा. शिक्षणात प्रगती. सामाजिक आदर वाढेल.
कोळसे नदीत सोडा.
मीन
‘द मून’ कार्ड अंतर्मन, गूढता आणि स्वप्नांचा संदेश देते. आध्यात्मिक शोध सुरू होईल. आर्थिक योजनांमध्ये सावधानता आवश्यक असेल. आरोग्यासाठी विश्र्रांती व ध्यान आवश्यक. प्रेमात भावनिक निर्णय घेऊ नका. आपल्याबद्दल गैरसमज होतील असे काहीही घडू देऊ नका. कुटुंबात ताजेपणा-समजूतदारपणा येईल. सावध निर्णय लाभदायी ठरतील.
गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करा.
शत्रू त्रास देत असल्यास : आपण कितीही चांगले असलो तरी आपल्यावर जळणारे, द्वेष करणारे कमी नसतात. यासाठी एका संध्याकाळी काळ्या हळदीचा लेप एका लिंबाला लावून, शत्रूचे नाव घेऊन आपल्यावरून 7 वेळा उलट्या दिशेने फिरवा आणि त्या लिंबाला दुसऱ्या दिवशी कोणत्याही तीन रस्ते मिळतात त्याच्या मध्यभागी टाकून द्या. शत्रूचा प्रभाव कमी होतो आणि मन:शांती मिळते.