कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अक्षरयात्रा राशिभविष्य

06:10 AM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

The Chariot – आत्मविश्वास व संकल्पशक्ति वृद्धिंगत होईल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास जास्त राहील, कामांमध्ये वेगाने प्रगती होईल. कार्यप्रवास आणि स्पर्धात्मक मिशन्समध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. नेतृत्व गुण दिसून येतील, पण विचलित होऊ नका. प्रेम-परिवारात ऊर्जा आणि सामंजस्य राहील. आरोग्य चांगले राहणार, पण हलका व्यायाम सुरू ठेवा.

Advertisement

रविवारी बांबूचे मूळ जवळ बाळगा.

वृषभ 

The Hierophant – थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. योग्य ते बदल घडतील. शिक्षण, धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबी पारदर्शक राहतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. प्रेमात निष्ठावान भावना वाढतील. आरोग्य सुधारेल. पारंपरिक वैद्यकीय उपायांचा विचार करावा.

गुरुवारी हलके उपवास करा व “ॐ गुं गुरुवे नम:” मंत्र जपा.

 

मिथुन 

The Magician कल्पनाशक्ती आणि निर्णयक्षमता या जोरावर तुम्ही नवीन कल्पनांची सिद्धी साधाल. संवाद कौशल्य व लेखन वातावरणात उपयोगी. नेटवर्किंगने प्रगती-प्रसंग निर्माण होईल. प्रेमात नवीन उत्कटता येईल. आरोग्यावर विचारपूर्वक लक्ष ठेवा. ध्येयपूर्तीस ठरावीक नियोजन करा. सगळ्यांवरच विश्वास ठेवू नका.

बुधवारी हिरवे अन्न खा.

कर्क 

The Moon – अंतर्मनाचे गूढ दिसेल. भावना प्रधान रहाल आणि या भावना मिश्रित राहतील. संभ्रम टाळण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. घरगुती वातावरणात संवाद वाढवा. प्रेमात स्पष्टता आवश्यक. आरोग्यावर ताणामुळे प्रभाव जाणवू शकतो. गुप्त माहिती समजून घ्या. शक्मयतो दुसऱ्यांच्या घरचे किंवा बाहेरचे खाणे खाऊ नका, बाधू शकते.

चंद्रप्रकाशात तुळशीचा ताजा अर्क उशाजवळ ठेवा.

सिंह 

The Sun – तेज, उत्साह, सामाजिक मान लाभेल. सामाजिक कार्य व सार्वजनिक मान वाढेल. नेतृत्व व प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रवास आणि कार्यक्रमासाठी योग. आरोग्य उत्तम, परंतु नियमित व्यायाम ठेवा. प्रेमात आनंद व उज्ज्वल भावना. गुऊवारी किंवा रविवारी विशेष संधी मिळू शकते. स्वभावात संयम, समर्पण आणि श्र्रद्धा वाढेल.

रविवारी सूर्यनमस्कार करा.

कन्या 

The Hermit – अंतर्मुखता व आत्मचिंतन. या आठवड्यात आपल्याला शांतता आणि आत्मनिरीक्षणाची गरज भासेल. स्वत:च्या अंतर्मनाशी संवाद करा. कामात तपशिलांवर लक्ष देण्याची क्षमता वाढेल. आरोग्य, ध्यान आणि योगात रस वाढेल. प्रेमात शांत वातावरण रहा. अडकलेल्या कामांसाठी नवा उपाय मिळेल.

गुरुवारी पंचामृत (दूध, दही, मध, गुळ, तिळ) देवाला अर्पण करा.

तुला 

Justice – न्याय, निर्णय. या आठवड्यात न्याय, संतुलन, निर्णयक्षमता वाढेल. शनिवारी किंवा गुऊवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कायदेशीर व आर्थिक बाबी स्पष्ट होतील. घरात संतुलित निर्णय घ्या. प्रेमात स्पष्ट अभिव्यक्ती गरजेची. आरोग्यावर नियमितता ठेवा. प्रेमसंबंध आणि कुटुंबात समन्वय आणि ऊर्जा असेल.

शुक्रवारी दूध व अत्तर दान करा.

वृश्चिक 

Death – रूपांतरण, नव्या सुऊवातीचे संकेत. जुन्या प्रकरणातून बाहेर येऊन नवी दिशा मिळेल. स्वत:त परिवर्तन करण्याची क्षमता वाढेल. काम व आर्थिक स्थिरता सुधारण्याची शक्मयता. प्रेमात नवीन सुरुवात संभवते. घरगुती व व्यक्तिगत गोष्टींमध्ये गुप्तता राखा. प्रेमात संभ्रम निर्माण होऊ शकतो; संवाद आवश्यक आहे. आरोग्यावर संयम ठेवा.

शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा.

धनु

Wheel of Fortune उत्साह आणि आत्मविश्वासाने भारलेल्या आठवड्याची सुऊवात असेल. नशिबाचे बदल आणि संधी. या आठवड्यात अनपेक्षित संधी व आर्थिक लाभ दिसतील. प्रवासात सुगम्यता व आनंद मिळेल. कामात जलद बदल व उन्नती. प्रेमात रोमान्स व नवे क्षण भेटतील. आरोग्य चांगले, पण सवय नियंत्रणात ठेवा.

गुरुवारी पिवळे फळ व बेसन लाडू दान करा.

मकर

The Emperor स्थिरता, अधिकार, शिस्त. आपल्या नेतृत्वगुणांवर भर असेल. प्रेम व मित्रपरिवारात आनंददायी घटना घडतील. कामात तपशिलांसाठी वेळ घेणे आवश्यक असेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आदर वाढेल. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. प्रेमात निष्ठा व दृढता दिसेल. आरोग्यावर नियंत्रण ठेवा.

शनिवारी काळे उडीद-तीळ दान करा.

कुंभ

The Fool – नवीन आरंभ आणि नवनवीन संधी. या आठवड्यात प्रवास, नवे उपक्रम, स्वातंत्र्याची अनुभूती मिळेल. रविवार व सोमवार खास सकारात्मक असतील. व्यावसायिक योजनांमध्ये नवे प्रयोग करा. आर्थिक बाबी सुधारणेच्या अगदी सुऊवातीला आहेत. प्रेमात नवे क्षण, आनंद. आरोग्य साधारण. व्यक्तिगत जीवनाला महत्त्व देता येईल.

बुधवारी हिरव्या भाज्या दान करा.

मीन 

The High Priestess – अंतर्ज्ञान, रहस्य, आंतरिक ज्ञान. या आठवड्यात अंतर्मन स्पष्ट संकेत देईल. गुप्त माहिती उघड होण्याची शक्मयता आहे. म्हणून कुणावरही जास्त विश्वास नको. कामात आध्यात्मिक किंवा गूढ गोष्टी समजून येतील. प्रेमात संवादाविना भावना व्यक्त होतील. आरोग्यावर शांतता ठेवा.

गुरुवारी तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करा.

 

मनोकामना पूर्ण होण्याकरता (1) शनिवार किंवा अमावास्येला पिंपळाचे पान तोडून त्यावर आपली इच्छा हळदीने लिहा. ते पान वाहत्या पाण्यात किंवा नदीत सोडा. यासोबत ‘ॐ नम: शिवाय’ मंत्र 108 वेळा जपा. हे 3 शनिवार करणे शुभ. (2) एक सुपारी घ्या आणि त्यावर आपल्या इच्छेचा मनोमन संकल्प करा. त्या सुपारीला मंदिरात नेऊन गणपतीसमोर ठेवून ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र 21 वेळा म्हणा. नंतर ती सुपारी घरात पूजेच्या ठिकाणी ठेवा. इच्छा पूर्ण होईपर्यंत रोज गणपतीला दुर्वा वाहा.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article