अक्षरयात्रा राशिभविष्य
मेष
या आठवड्यात The Sun कार्डच्या प्रभावामुळे तुमच्यात नवी ऊर्जा आणि सकारात्मकता वाढेल. जुनी अडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे संकेत दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचे मत मान्य होईल. प्रेमसंबंधात सुसंवाद वाढेल आणि जुने गैरसमज दूर होतील. प्रवासाचा योग आहे. आरोग्य चांगले राहील. पूर्वीच्या काही कामांमध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. रविवारचा दिवस विशेष शुभ.
सूर्याला पाणी अर्पण करा.
वृषभ
The Lovers कार्ड सूचित करते की, नातेसंबंधात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. प्रेमसंबंधात समंजसपणा ठेवा. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. आर्थिक व्यवहारात नवे प्रस्ताव येतील. नव्या करारांमध्ये लाभ होईल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. जुने प्रश्न मिटतील. प्रवासाचा योग आहे. गुऊवारी शुभ घटना घडण्याची शक्मयता.
गणपतीला दूर्वा व 21 मोदक अर्पण करा.
मिथुन
The Magician कार्ड तुम्हाला आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता देणारे आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत नवी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नावीन्याचा विचार करा. प्रेमात अपेक्षित गोडवा राहील. काही जुने मित्र भेटू शकतात. नवीन ओळखी भविष्यात उपयुक्त ठरतील. मानसिकदृष्ट्या समाधानकारक आठवडा. प्रवास लाभदायक.
घरात तुळशीचे रोप लावा.
कर्क
The Moon कार्डमुळे भावना वाढीला लागतील. काही गोष्टी गुप्त ठेवल्या जातील. प्रेमसंबंधात थोडा ताण येण्याची शक्मयता आहे. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरगुती वातावरण सौम्य राहील. कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक. अनपेक्षित खर्च संभवतो. प्रवास टाळावा. ध्यान आणि साधना लाभदायक ठरेल. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे.
शिवलिंगावर कच्चे दूध व पाणी अर्पण करा.
सिंह
The Emperor कार्डच्या प्रभावामुळे नेतृत्व गुण वाढतील. कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. वरिष्ठांची मदत मिळेल. प्रेमसंबंधात थोडी जबाबदारी वाढेल. कौटुंबिक वाद मिटण्याची शक्मयता. प्रवास फायदेशीर ठरेल. जुने प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य सामान्य. शनिवारी एखादी शुभ बातमी मिळण्याचा योग.
हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि तेल चढवा.
कन्या
The Star कार्ड आशादायी संकेत देते. अडचणी दूर होतील. आर्थिक लाभाचा योग. नवा प्रोजेक्ट सुरू होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. घरात शुभ कार्य ठरेल. जुने वाद मिटतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी. प्रवासाचे योग. आरोग्य चांगले राहील. गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ. कामात गुप्त योजना यशस्वी. आर्थिक लाभाची शक्यता. प्रेमसंबंधात गुपित उघड होऊ शकते.
लाल फळे किंवा गूळ दान करा.
तुळ
Justice कार्ड तुम्हाला न्यायनिष्ठ राहण्याचा संदेश देते. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. कौटुंबिक बाबतीत निर्णायक भूमिका घ्या. प्रेमसंबंधात स्पष्टपणा ठेवा. कामात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांची साथ मिळेल. जुने वाद मिटण्याची शक्मयता. प्रवास लाभदायक. आरोग्यावर लक्ष द्या. शनिवार-रविवारी महत्त्वाचा निर्णय घ्याल.
शुक्रवारी गरीब महिलांना सुंगधीत उटणे व लवंग दान करा.
वृश्चिक
Death कार्ड जुने सोडून नव्या सुरुवातीचा संदेश देते. काही गोष्टी संपतील, पण त्यातून नवी दिशा मिळेल. कामात बदलाचा योग. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात नवा मोड. जुने मित्र दूर, नवे मित्र जोडले जातील. प्रवास योग. मानसिक शांतता राखा. आरोग्य चांगले. ध्यान उपयुक्त. नवे प्रोजेक्ट सुरू करू शकता. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. प्रेमसंबंधात थोडा तणाव.
घरात रोज सकाळी शंखनाद करा.
धनु
Wheel of Fortune कार्ड नशिबाचा चांगला काळ दाखवते. अनपेक्षित संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतो. प्रेमसंबंध गोड होतील. कामात नाव कमवाल. जुने वाद मिटतील. घरात आनंददायी वातावरण. प्रवासाच्या संधी मिळतील. आरोग्य चांगले. शनिवारी यशाचा दिवस. कामात अचानक यश. आरोग्य सामान्य राहील. जुने काम मार्गी लागतील.
बेसन लाडू दान करा.
मकर
The Hierophant कार्ड परंपरेचा सन्मान करायला सांगते. कुटुंबाच्या सल्ल्याचा लाभ. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कामात वरिष्ठांची साथ मिळेल. प्रेमसंबंधात संयम ठेवा. जुने मित्र भेटतील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवास लाभदायक होईल. आरोग्य सुधारेल. गुरुवार विशेष शुभ आहे. नवीन कल्पनांना चालना मिळेल. कामात नवे प्रस्ताव. आर्थिकदृष्ट्या लाभदायक.
काळे उडीद दान करा.
कुंभ
The Fool कार्ड नवीन सुरुवात सूचित करते. नवे प्रकल्प सुरू करा. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रेमसंबंधात थोडा तणाव. प्रवासाचा योग. घरात बदल. जुने प्रश्न मिटतील. आरोग्य सामान्य. शनिवारी विशेष काम यशस्वी. मित्रांकडून मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण. प्रेमसंबंधात हक्क गाजवू नका. प्रवासाचा योग आहे. नवी कामे सुरू करण्यासाठी योग्य काळ.
लाल वस्त्रात गूळ बांधून माऊतीला अर्पण करा.
मीन
The High Priestess कार्ड अंतर्ज्ञान वाढवते. कामात गुप्त योजना यशस्वी. आर्थिक लाभ. प्रेमसंबंधात गुपित उघड होण्याची शक्मयता. ध्यान आणि साधना लाभदायक. आरोग्य सुधारेल. घरात शांतता. नवे संपर्क लाभदायक. जुने वाद मिटतील. रविवार शुभ. काही जुने मित्र भेटतील. कामात नव्या संधी मिळू शकतात. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
दारूच्या व्यसनामुळे कित्येक कुटुंबे रसातळाला गेली आहेत. हा एक रोग आहे असेच म्हणावे लागेल. यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि तेल वाहत्या पाण्यात सोडावे. ‘ॐ शनैश्चराय नम:’ मंत्र 108 वेळा म्हणावा. त्या दिवशी पूर्ण उपवास करून रात्री हनुमान चालीसा किंवा रामरक्षा पठण करावे. हा उपाय व्यसन आणि वाईट संगतीपासून मुक्त करतो. याच बरोबर गायीला गुळ-हरभऱ्याचे दाणे द्यावे, पिवळ्या वस्त्रात हळदीच्या गाठीचा तुकडा जवळ ठेवावा आणि सकाळी स्नान करून तुळशी पत्र खावे.