राशिभविष्य
मेष
या आठवड्यात तुमच्यात धैर्य आणि उत्साह अधिक वाढलेला दिसेल. नवीन निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होईल आणि थांबलेली कामे पुढे सरकू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते. नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक राहील. पैशांच्या बाबतीत थोडा लाभ होण्याची शक्मयता आहे. आठवड्याच्या शेवटी मनातील एखादी चिंता दूर झाल्यासारखे वाटेल.
उपाय: मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी गुलाबपाणी मिसळलेले पाणी झाडाला अर्पण करा.
वृषभ
हा आठवडा स्थिरता आणि मानसिक शांतता घेऊन येत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील. मनातील भावना व्यक्त केल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. स्वत:साठी वेळ काढल्याने मन प्रसन्न राहील.
उपाय : शुक्रवारी पांढऱ्या कापडात तांदूळ बांधून मंदिरात दान करा.
मिथुन
या आठवड्यात बोलण्याची कला तुमची ताकद ठरेल. लोकांशी झालेल्या संवादातून चांगल्या गोष्टी घडू शकतात. मनात अनेक विचार सुरू राहतील, त्यामुळे एकावेळी एकच काम पूर्ण करण्यावर भर द्या. छोटा प्रवास आनंद देऊ शकतो. गैरसमज दूर होण्याची शक्मयता आहे. झोप आणि विश्र्रांतीकडे दुर्लक्ष करू नका.
उपाय :बुधवारी हिरव्या मुगाचे अकरा दाणे वाहत्या पाण्यात सोडा.
कर्क
या आठवड्यात भावना अधिक तीव्र जाणवतील, पण अंतर्मनाची शक्तीही वाढलेली असेल. कुटुंबाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. देवधर्म, जप, ध्यान किंवा तीर्थयात्रेमुळे मनाला खोल शांतता मिळेल. पैशांच्या बाबतीत संयम ठेवणे आवश्यक राहील. स्वत:ची ऊर्जा जपणे महत्त्वाचे राहील.
उपाय :सोमवारी चंद्राला कच्च्या दुधाचे काही थेंब अर्पण करून मनातील इच्छा व्यक्त करा.
सिंह
या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षित करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. अहंकारामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत थोडा लाभ मिळू शकतो. जुन्या आवडीची गोष्ट पुन्हा सुरू करण्याची इच्छा निर्माण होईल.
उपाय :रविवारी गूळ आणि गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे गायीला खाऊ घाला.
कन्या
हा आठवडा नियोजन आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. तुमची शिस्तबद्ध वृत्ती तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल. मानसिक ताण वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेसंबंधांमध्ये भावना प्रेमाने व्यक्त करणे आवश्यक राहील. एखादे जुने स्वप्न पुन्हा मनात जागृत होऊ शकते.
उपाय :बुधवारी एका पुस्तकात लवंग ठेवून सात दिवसांनी ती झाडाखाली ठेवा.
तुला
या आठवड्यात समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे राहील. नातेसंबंधांमध्ये शांत संवादामुळे जवळीक वाढेल. नवीन ओळख किंवा सहकार्य लाभदायक ठरू शकते. मित्रपरिवारासोबत वेळ छान जाईल. स्वत:च्या मनाचा आवाज ऐकणे आवश्यक राहील.
उपाय : शुक्रवारी सुगंधी अत्तराचा एक थेंब मंदिरात अर्पण करा.
वृश्चिक
या आठवड्यात बदलांची ऊर्जा प्रभावी राहील. काही लोकांचे खरे स्वभाव समोर येऊ शकतात. भावनिक चढउतार जाणवतील, पण त्यातूनच तुम्ही अधिक मजबूत व्हाल. पैशांच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. शांत चिंतनामुळे मन स्थिर राहील.
उपाय :मंगळवारी लाल मसूर पक्षांना द्या.
धनु
या आठवड्यात नवीन विचार आणि नवीन दिशा मिळू शकते. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल. सकारात्मक विचारांमुळे मन प्रसन्न राहील. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली दिसते.
उपाय : गुऊवारी हळदीचा छोटा टिळा लावून घराबाहेर पडा.
मकर
कामाचा ताण वाढू शकतो, पण त्यातूनच यश मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील पण तुमची मेहनत फळ देईल. पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने मन हलके वाटेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
उपाय :शनिवारी काळ्या तिळाचे काही दाणे वाहत्या पाण्यात सोडा.
कुंभ
या आठवड्यात नवीन कल्पना आणि सर्जनशीलता वाढेल. मित्रांकडून मदत मिळू शकते. काही अचानक बदल सुऊवातीला गोंधळ निर्माण करतील, पण पुढे त्याचा फायदा होईल. मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक राहील.
उपाय :शनिवारी लोखंडी वाटीत पाणी भरून त्यात स्वत:चा चेहरा पाहा आणि ते पाणी झाडाला अर्पण करा.
मीन
या आठवड्यात अंतर्मनाची शक्ती खूप वाढलेली राहील. देवधर्म, प्रार्थना आणि ध्यान यांचा सकारात्मक परिणाम जाणवेल. जुन्या भावनिक जखमा भरून येण्यास सुऊवात होईल. संयम ठेवल्यास अनेक गोष्टी योग्य वेळी घडतील. मनाला शांतता आणि समाधान मिळेल.
उपाय :गुऊवारी हळद किंवा केशराचा छोटा ठिपका वही किंवा पाकिटाला लावा.
संपूर्ण आठवड्याचा सामूहिक उपाय :
रात्री झोपण्यापूर्वी काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात एक छोटी वेलची टाका आणि तो ग्लास पलंगाजवळ ठेवा. सकाळी ते पाणी कोणत्याही झाडाला अर्पण करा.