For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षरयात्रा टॅरो भविष्य

06:05 AM Apr 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
अक्षरयात्रा टॅरो भविष्य
Advertisement

मेष

Advertisement

या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. बराच काळ अडकलेली कामे आता हळूहळू मार्गी लागतील आणि तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. मात्र आतून थोडी घाई आणि अस्वस्थता जाणवू शकते, जणू सगळे लगेच घडावे असे वाटेल. अशा वेळी संयम ठेवणे खूप आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शब्दांची निवड जपून करा. आर्थिक बाबतीत परिस्थिती स्थिर असली तरी अनावश्यक खर्च टाळा.

 मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.

Advertisement

वृषभ

हा आठवडा तुम्हाला स्थैर्य आणि स्पष्टता देणारा आहे. तुम्ही जे निर्णय सतत पुढे ढकलत होतात, ते आता घेण्याची योग्य वेळ आहे. मेहनतीचे फळ मिळायला सुऊवात होईल. नवीन संधी मिळू शकतात, पण त्याकडे वास्तववादी दृष्टीकोनातून पहा. नात्यांमध्ये गोडवा राहील, पण हट्ट किंवा अहंकारामुळे काही गोष्टी बिघडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषत: थकवा जाणवू शकतो.

शुक्रवारी देवीला पांढरी फुले अर्पण करा.

मिथुन

तुमच्या मनात खूप विचारांची गर्दी असेल. तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करत असाल, पण त्यातून गोंधळही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोठे निर्णय घेण्यात घाई करू नका. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना सुचतील, पण त्यांना योग्य दिशा देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. नात्यांमध्ये स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवा, त्यामुळे गैरसमज टळतील.

बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करा.

कर्क

हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल जाणारा आहे. काही जुन्या आठवणी किंवा भावना पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. पण हेच तुम्हाला स्वत:ला समजून घेण्याची संधी आहे. कामाच्या बाबतीत स्थिरता आहे, पण स्दूग्न्atग्दह कमी वाटू शकते. नात्यांमध्ये दजहहे ठेवा.

सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा.

सिंह

या आठवड्यात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. त्यामुळे जबाबदाऱ्या वाढतील. नात्यांमध्ये थोडे सौम्य वागा, कारण कधी कधी तुमचा प्रभाव जास्त जाणवतो. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्मयता आहे.

उपाय: रविवारी सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या

हा आठवडा आत्मपरीक्षणासाठी योग्य आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वत:लाच थकवत आहात. थोडे रिलॅक्स होणे गरजेचे आहे. कामात सातत्य ठेवा, कारण तुमची छोटी छोटी काळजी घेण्याची सवयच तुम्हाला पुढे नेईल. नात्यांमध्ये थोडे हलके आणि मोकळे वागा.

बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घाला.

तुला

तुमच्या आयुष्यात संतुलन आणण्याची ही वेळ आहे. तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्यात स्वत:कडे दुर्लक्ष करत आहात. आता स्वत:च्या गरजांकडे लक्ष द्या. काही नात्यांमध्ये स्पष्टता येईल आणि काही लोक दूर जाऊ शकतात, पण ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल.

शुक्रवारी सुगंधी अगरबत्ती लावा.

वृश्चिक

हा आठवडा बदल आणि रूपांतर घेऊन येतो. काही गोष्टी अचानक बदलू शकतात, ज्यामुळे सुऊवातीला अस्वस्थ वाटेल. पण हे बदल तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. नात्यांमध्ये तीव्रता जास्त असेल, त्यामुळे जास्त पझेसिव्ह होणे टाळा. कामात लक्ष केंद्रित ठेवा.

मंगळवारी लाल फुले अर्पण करा.

धनु

या आठवड्यात सकारात्मकता आणि नवीन संधी मिळतील. तुम्हाला काही नवीन शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योगही दिसत आहेत. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल.

गुऊवारी पिवळे अन्न दान करा.

मकर

हा आठवडा मेहनत आणि शिस्त यावर आधारित आहे. तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण त्याचे परिणाम थोड्या उशिराने मिळतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये थोडा दुरावा जाणवू शकतो, त्यामुळे भावना व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करा.

कुंभ

या आठवड्यात तुम्हाला काही नवीन करण्याची इच्छा होईल. तुम्ही जुन्या सवयींपासून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. तुमची सर्जनशीलता वाढेल आणि कामात नवे मार्ग सापडतील. नात्यांमध्ये स्वातंत्र्य महत्त्वाचे ठरेल.

शनिवारी गरजूंना अन्नदान करा.

मीन

हा आठवडा आध्यात्मिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल, त्यावर विश्वास ठेवा. नात्यांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. कामात सर्जनशीलता दिसेल. ध्यान केल्याने अधिक स्पष्टता मिळेल.

गुऊवारी ध्यान करा आणि पिवळे फूल अर्पण करा.

सर्व राशींसाठी सामान्य उपाय

या आठवड्यात एक वेगळा आणि प्रभावी उपाय असा की दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर तुमच्या मनात असलेली एक चिंता किंवा भीती लिहा आणि तो कागद दुमडून सुरक्षित ठेवा. सात दिवसानंतर तो कागद जाळून टाका किंवा पाण्यात विसर्जित करा. यामुळे मनातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू मुक्त होईल आणि नवीन सकारात्मक ऊर्जा आयुष्यात येईल.

Advertisement
Tags :

.