For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षरयात्रा -राशिभविष्य

06:10 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
अक्षरयात्रा  राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

या आठवड्यात The Sun  आणि The Fool  कार्डची ऊर्जा तुम्हाला नवा उत्साह देईल. जुनी अडचण दूर होईल व नवी दिशा सापडेल. आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. प्रवासाचा योग संभवतो. कामाच्या ठिकाणी नाविन्यपूर्ण संधी मिळतील. कुटुंबात एखादी गोड बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहील, पण त्वचेची काळजी घ्या. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.

मंदिरात नारळ अर्पण करा.

Advertisement

वृषभ

या आठवड्यात The Empress Je Nine of Pentacles कार्डस तुम्हाला आर्थिक समृद्धीचे संकेत देतात. व्यावसायिक बाबतीत यश मिळेल. जुने काम पूर्ण होऊन समाधान मिळेल. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. आरोग्य सुधारेल. मानसिक शांतता लाभेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

स्मशानात पाण्याची सोय करा.

मिथुन

The Magician  आणि Two of Cups कार्डमुळे या आठवड्यात तुम्हाला हरकाम्या यशाचा अनुभव येईल. व्यावसायिक संधी लाभतील. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य लाभेल. नवीन करार किंवा डील फायदेशीर ठरतील. आरोग्य काहीसे चढ-उताराचे राहू शकते. जुन्या मित्रांचा संपर्क येईल. गुपित योजना फळाला येतील. विरोधकांवर मात कराल.

जुगार इत्यादी खेळणे पूर्णत: टाळा.

कर्क

या आठवड्यात The Star  आणि Page of Cups कार्ड तुम्हाला आशावादी बनवतील. जुन्या अडथळ्यांवर मार्ग सापडेल. घरात एखादी आनंदाची बातमी येईल. कामात नावीन्याचा अनुभव येईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रेमसंबंधात नवीन सुऊवात होईल. विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ. आरोग्याच्या दृष्टीने पाणी पिण्यावर भर द्या. लहान प्रवासाचा योग आहे.

रात्री दूध पिऊ नका.

सिंह

या आठवड्यात Strength  आणि  King of Wands  aहे् कार्डमुळे आत्मविश्वास व नेतृत्वगुण वाढतील. आव्हाने पेलता येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामात यश मिळेल. कुटुंबात स्नेह वाढेल. प्रेमसंबंधात थोडा धीर धरा. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठांची मर्जी जिंकता येईल. नव्या प्रकल्पाची सुऊवात अनुकूल. सामाजिक सन्मान वाढेल. जुनी संपत्ती किंवा मालमत्तेचा फायदा संभवतो.

अंध व्यक्तींना जेवण द्या.

कन्या

Justice आणि  Nine of Cups कार्डच्या प्रभावामुळे या आठवड्यात निर्णय योग्य ठरतील. आर्थिक लाभाचा योग आहे. कायदेशीर बाबतीत यश मिळेल. कुटुंबात एखाद्या वादाचा शेवट होईल. प्रेमसंबंधात समाधान मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होईल. आरोग्य सुधारेल. नोकरीत बढती किंवा मान्यता मिळेल. जुनी अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा काळ. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या.

तूळ

या आठवड्यात The Lovers व  Wheel of Fortune कार्डमुळे नातेसंबंधांमध्ये स्थैर्य आणि सौहार्द वाढेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. कामात अचानक चांगले यश मिळेल. प्रवासाचे योग. नवा करार फायदेशीर. आरोग्य उत्तम. मित्रांच्या मदतीने अडचण दूर होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. गुंतवणुकीत यश. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

घरामध्ये यज्ञयाग करा.

वृश्चिक

Death Je Ace of Pentacles कार्डमुळे जीवनात बदल घडेल. जुन्या गोष्टी संपतील आणि नव्या संधी मिळतील. आर्थिक लाभ. व्यवसायात सुधारणा. नोकरीत बढती. कुटुंबात आनंदाचे वातावरण. आरोग्याच्या दृष्टीने आहाराकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात मोकळेपणाने चर्चा करावी. अचानक प्रवासाचा योग. एखादी अपेक्षित बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

मंदिरात बदाम अर्पण करा.

धनु

या आठवड्यात The Hierophant Je Three of Wands कार्डमुळे दीर्घकालीन योजना आखा. शिक्षणात प्रगती. आध्यात्मिक क्षेत्रात आकर्षण. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामात नावीन्यपूर्ण यश. प्रेमसंबंधात स्थैर्य. कौटुंबिक वातावरण समाधानकारक. प्रवासाचे योग. जुना मित्र भेटेल. आरोग्य सुधारेल. वेळेचे व्यवस्थापन करा. मांसाहार करू नका.

दारू पिऊ नका.

मकर 

The Chariot  आणि Four of Pentacles  कार्डच्या प्रभावामुळे पुढे जाण्याचा संधीसंधान काळ. आर्थिक बाजू मजबूत. एखाद्या प्रकल्पात यश. प्रवासाचे योग. कुटुंबात गोडवा वाढेल. प्रेमसंबंधात थोडा वेळ द्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुन्या अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. आत्मविश्वास प्रबळ राहील.

मेव्हणा, भाचा, जावई यांना मदत करा.

कुंभ

या आठवड्यात The Hermit Je Queen of Cups कार्डमुळे अंतर्मुखतेचा काळ. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. आर्थिक लाभाचा योग. जुना प्रकल्प पूर्ण. कुटुंबात जुने वाद मिटतील. प्रेमसंबंधात मोकळेपणा ठेवा. आरोग्य सुधारेल. मानसिक शांतता मिळेल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग. जुनी गोष्ट उजेडात येईल. स्वत:वर विश्वास ठेवा.

बदामाचे तेल डेरेदार झाडाखाली टाका.

मीन 

The High Priestess  आणि  Ten of Cups कार्डच्या प्रभावामुळे आठवड्याची सुऊवात गोड होईल. कुटुंबात सौख्य लाभेल. आर्थिक सुधारणा. नवा करार फायदेशीर. कामात नावीन्य. प्रवासाचे योग. आरोग्य चांगले. प्रेमसंबंधात सौहार्द. जुने मित्र भेटतील. मन:शांती मिळेल. गूढ गोष्टीत ऊची वाढेल. मित्रांबरोबर वेळ घालवता येईल. निर्णय घेताना थोडा संयम बाळगा.

लोखंडाचा चौकोनी तुकडा जमिनीत पुरा.

प्रत्येक महिन्यामध्ये तुमची जन्म तारीख ( Birth Date) येते. त्या दिवशीच्या तारखेची एकांकी बेरीज करावी. उदा. समजा तुमची जन्म तारीख 15 आहे (महिना/साल सोडून द्या) आणि आजची तारीख 15/06/2025 आहे. तर 1+5+0+6+2+0+2+5 = 21: आता 2+1 = 3.. पुढच्या महिन्यात 3, 12, 21,30  या तारखांना महत्त्वाची कामे केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते.

Advertisement
Tags :

.